Akshay Kumar : बॉलीवूडचा खिलाडी म्हणून ओळखला जाणारा अक्षय कुमार त्याच्या ‘पॅड मॅन’, ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ या चित्रपटांमुळे चांगलाच चर्चेत आला होता. त्याने या सिनेसृष्टीला आजवर बरेच सुपरहिट चित्रपट दिलेत. मात्र, गेल्या काही वर्षांत सिनेविश्वात त्याचे चित्रपट हवी तशी कामगिरी करताना दिसत नाहीत. अशात अभिनेत्याने सामाजिक संदेश देणाऱ्या चित्रपटांबाबत वक्तव्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Bigg Boss 18: ‘बिग बॉस ११’च्या विजेतीने दिग्विजय राठीला केलं समर्थन; शिल्पा शिरोडकरला म्हणाली…

सामाजिक संदेश देणाऱ्या चित्रपटांमध्ये जास्त ड्रामा आणि अ‍ॅक्शन पाहायला मिळत नाही. त्यामध्ये विषयाला धरून नागरिकांपर्यंत जास्तीत जास्त सामाजिक संदेश पोहोचवण्याचे काम केले जाते. त्यामुळे असे चित्रपट तिकीट खिडकीवर जास्त चालतीलच, असे नाही. त्यामुळे यावर बोलतना अक्षयने त्याची आवड सांगितली आहे.

‘एएनआय’ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अक्षय कुमारला तो सामाजिक संदेश देणारे चित्रपट जास्त का करतो, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना अक्षय म्हणाला, “आपल्या समाजाचं आपण काही देणं लागतो. त्यामुळे समाजाला काहीतरी चांगल्या गोष्टी देण्याची ही माझी एक पद्धत आणि आवड आहे. मला माहीत आहे की, जर मी ‘सिंग इज किंग’ किंवा ‘रावडी राठोड’ अशा चित्रपटांत काम केलं, तर चौपट जास्त पैसे कमवेन.”

तसेच यावर बोलताना अक्षयने पुढे म्हटले, “मी शौचालयावर ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ चित्रपट केला. तसेच सॅनिटरी पॅडवर ‘पॅडमॅन’ चित्रपट केला. लोकांच्या मनात या गोष्टी फार खोलवर रुजल्या आहेत. त्यांना याची सवय झाली आहे. त्यामुळे त्यांच्या मनावर यातील चांगल्या आणि योग्य गोष्टी बिंबाव्यात यासाठी मला असे चित्रपट करणे आवडते. मला माहीत आहे की, असे चित्रपट मला जास्त पैसे कमावून देणार नाहीत. मात्र, तरीही मला असे चित्रपट करणं आवडतं.”

अशा चित्रपटांतून जास्त पैसे कमवता येत नाहीत आणि त्यामुळे मी स्वत: चित्रपट प्रोड्युस करतो. कारण- विषय फक्त पैसे कमवण्याचा नसतो. लैंगिक शिक्षणावर चित्रपट करण्याची कुणाची हिंमत आहे का? तुम्ही बॉलीवूड पाहा किंवा हॉलीवूड; कुठेतरी या विषयावर चित्रपट आहे का?, असा प्रश्न पुढे अक्षय कुमारने विचारला आहे.

हेही वाचा : “मी तिला झापड मारली”, अमोल पालेकरांनी सांगितला स्मिता पाटील यांना न सांगता केलेल्या सीनचा प्रसंग; म्हणाले “ती संतापली होती”

अक्षयला लहानपणापासूनच असे चित्रपट बनवण्याची आवड होती. मात्र, जवळ पैसे नसल्याने त्यानं स्वत:चं एक प्रॉडक्शन हाऊस सुरू केलं आणि आता तो असे चित्रपट बनवत आहे, असंही त्यानं या मुलाखतीच्या शेवटी सांगितलं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshay kumar like social message movies he questions anyone have guts to make sex education film rsj