Sarfira box office collection day 1: अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ‘सरफिरा’ चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. हा २०२० मध्ये आलेला राष्ट्रीय पुरस्कार-विजेता चित्रपट ‘सूरराई पोत्रू’चा हिंदी रिमेक आहे. सुधा कोंगारा दिग्दर्शित हा चित्रपट भारतातील पहिली स्वस्त एअरलाइन सुरू करणाऱ्या कॅप्टन गोपीनाथ यांच्या जीवनावर आधारित आहे. राधिका मदान, परेश रावल व सीमा बिस्वास यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या या हिंदी रिमेकने पहिल्या दिवशी किती कमाई केली, याची आकडेवारी समोर आली आहे.

इंडस्ट्री ट्रॅकर ‘सॅकनिल्क’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘सरफिरा’ने पहिल्या दिवशी फक्त २.४० कोटी रुपये कमावले. हे आकडे अक्षयच्या कुमारच्या आधीच्या चित्रपटाच्या ओपनिंगच्या तुलनेत खूपच कमी आहेत. त्याचा एप्रिलमध्ये आलेला ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ने पहिल्या दिवशी १६.०७ कोटी रुपये कमावले होते, पण ३०० कोटीहून अधिक बजेट असलेल्या सिनेमाचे एकूण कलेक्शन फक्त ५९.१७ कोटी रुपये होते, त्यामुळे हा चित्रपट फ्लॉप झाला होता.

Chhaava Movie New Release Date
तारीख ठरली! ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार बहुप्रतीक्षित ‘छावा’ चित्रपट; विकी कौशल म्हणाला, “३४४ वर्षांनंतर…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
IMDB most anticipated movie
२०२५ मध्ये ‘या’ २० चित्रपटांची सिनेप्रेमींना आहे प्रतीक्षा, सलमान खान पासून ते अक्षय कुमार पर्यंत ‘या’ स्टार्सच्या सिनेमांचा आहे समावेश
premachi goshta 2
मराठी चित्रपट ‘प्रेमाची गोष्ट २’ची रिलीज डेट ठरली, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
akshay kumar filing kite with paresh rawal
Video : ‘भूत बंगला’च्या सेटवर अक्षय कुमारने उडवली पतंग; तर परेश रावल यांनी धरली फिरकी, व्हायरल झाला व्हिडीओ
arjun rampal grandfather designed first artillery gun for Indian Army
तब्बल १४ फ्लॉप चित्रपट देऊनही जिंकलेला राष्ट्रीय पुरस्कार, ‘या’ बॉलीवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
Ya goshtila Navach Nahi , cinema , pune ,
चंदेरी पडदा आणि गडद काळा अंधार
Nitish Chavan
‘लाखात एक आमचा दादा’ फेम नितीश चव्हाणने शेअर केला ईशा संजयबरोबर व्हिडीओ; नेटकरी म्हणाले, “नाव सांगू का शीतलला?”

“माझे चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर बॉलीवूडमधील काही लोक…”, अक्षय कुमारने सांगितला फिल्म इंडस्ट्रीतील अनुभव

१५ वर्षांतील अक्षयच्या सिनेमांपैकी ‘सरफिरा’ची सर्वात कमी ओपनिंग

अक्षय कुमारची गेल्या काही वर्षांत बॉक्स ऑफिसवर भयंकर निराशा झाली आहे. ‘सूर्यवंशी’ आणि ‘ओएमजी २’ वगळता त्याचे सर्व चित्रपट फ्लॉप झाले. बॉलीवूड हंगामाच्या डेटानुसार, ‘सरफिरा’ने अक्षयच्या २००९ मध्ये आलेल्या ‘8X10 तसवीर’ सिनेमानंतर सर्वात कमी ओपनिंग केली आहे. या चित्रपटाने १.८ कोटी कमावले होते. ‘मिशन राणीगंज’ने २.८, ‘सेल्फी’, २.५ आणि करोना काळात रिलीज झालेल्या ‘बेल बॉटम’ने २.५ कोटींची ओपनिंग केली होती. त्यापेक्षाही या सिनेमाची कमाई कमी आहे. अलीकडच्या काळात त्याचे फ्लॉप ठरलेले ‘बच्चन पांडे’ आणि ‘राम सेतू’ यांनीही पहिल्या दिवशी अनुक्रमे १३ व १५ कोटींची कमाई केली होती.

“ती आमच्या कुटुंबातील…”, आमिर खानच्या मुलाने सावत्र आई किरण रावबद्दल केलं वक्तव्य; तिचा एकेरी उल्लेख करत म्हणाला…

फ्लॉप चित्रपटांबद्दल अक्षय कुमार म्हणाला…

पाच वर्षांपूर्वी एकाच वर्षात २०० कोटी रुपयांचे चार हिट चित्रपट देणाऱ्या अक्षयच्या अलीकडील सात चित्रपटांनी अपेक्षेपेक्षा कमी कमाई केल्याने अभिनेत्याची चिंता वाढवली आहे. ‘गॅलाटा प्लस’ला दिलेल्या मुलाखतीत अक्षय कुमार म्हणाला, “मी जर एका वर्षात फक्त दोनच चित्रपट केले, तर त्याची काय खात्री आहे की, ते दोन्ही चित्रपट ब्लॉकबस्टर ठरतील.” त्याचे चित्रपट सलग बॉक्स ऑफिसवर आदळल्यानंतर अनेकांनी त्याला इतके चित्रपट करण्यापेक्षा चांगली कथा असलेले चित्रपट निवडण्याचा सल्ला दिला होता. त्यावर “मी लोकांना चित्रपट निवडून काम करताना पाहिलं आहे; पण त्यांचे चित्रपटही फ्लॉप होताना पाहिले आहेत. आपल्या इंडस्ट्रीमध्ये काय होते, जर आपण सतत फ्लॉप चित्रपट देत राहिलो, तर लोक आपल्याला काम देत नाहीत,” असं तो म्हणाला.

Sarfira box office collection day 1
‘सरफिरा’ चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईची आकडेवारी आली समोर (फोटो – इन्स्टाग्राम)

“तिचे खूप उपकार, तिच्यामुळेच करिअर करू शकलो”; नाना पाटेकर यांचं पत्नीबद्दल वक्तव्य, वेगळं राहण्याबाबत म्हणाले…

बॉक्स ऑफिसवर चालत असलेले इतर चित्रपट

अक्षय कुमारच्या या चित्रपटाला कमल हासन यांचा ‘इंडियन २’ हा चित्रपट चांगलीच टक्कर देत आहे. हा चित्रपटही शुक्रवारीच प्रदर्शित झाला. याशिवाय अमिताभ बच्चन, प्रभास आणि दीपिका पादुकोण यांचा ‘कल्की 2898 एडी’ अजुनही सिनेमागृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. २७ जून रोजी प्रदर्शित झालेल्या ‘कल्की 2898 एडी’ने तिसऱ्या शुक्रवारी ५.२५ कोटी रुपये कमावले. चित्रपटाने तीन आठवड्यात भारतात ५४८.६० कोटींची कमाई केली आहे.

Story img Loader