बॉलीवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार हा कायमच विविध कारणांनी चर्चेत असतो. बॉलीवूडमधील आघाडीचा कलाकार म्हणून त्याला ओळखले जाते. पण, त्याच्याकडे कॅनडाचे नागरिकत्व असल्याने अनेकदा टीका झाली आहे. पण, आता अखेर अक्षय कुमारला भारताचे नागरिकत्व प्राप्त झाले आहे. त्याने स्वत: पोस्ट करत चाहत्यांना ही गुडन्यूज दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अक्षय कुमारने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ट्विटरवर एक ट्विट केले आहे. त्यात अक्षयने भारतीय नागरिकत्व प्राप्त झाल्याची गुडन्यूज चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. “मन आणि नागरिकत्व दोन्हीही हिंदुस्तानी. स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. जय हिंद”, असे कॅप्शन त्याने या फोटोला दिले आहे.
आणखी वाचा : अक्षय कुमारच्या ‘ओह माय गॉड २’ चित्रपटाबद्दल शरद पोंक्षेंची प्रतिक्रिया, म्हणाले… 

अक्षय कुमारला भारतीय नागरिकत्व प्राप्त झाल्यानंतर सिनेसृष्टीतील अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत; तर अक्षयच्या काही चाहत्यांनी ‘ट्रोल करणाऱ्यांची तोंडं कायमची बंद झाली’, अशा कमेंट करत त्याचे अभिनंदन केले आहे.

आणखी वाचा : “नितीन देसाईंची घटना, राजकारण्यानी बुडवलेले पैसे अन्…”, प्रसिद्ध मराठी सेलिब्रेटी फोटोग्राफरच्या जिवाला धोका, म्हणाला “त्याच्याबद्दल काही पुरावे…”

दरम्यान, अक्षय कुमारकडे याआधी कॅनडाचं नागरिकत्व होते. अक्षयच्या कॅनेडियन नागरिकत्वावरून त्याला कॅनडा कुमार अशी टीका करण्यात आली होती. त्यावेळी अक्षयने कॅनेडियन नागरिकत्व का स्वीकारले, याबद्दल स्पष्टीकरण दिले होते.

“अनेक वर्षांपूर्वी माझे चित्रपट चांगले चालत नव्हते. माझे जवळपास १४-१५ चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले. त्यावेळी मला असे वाटलं की मी कुठेतरी दुसरीकडे काम करायला हवे. यानंतर मी माझ्या कॅनडामध्ये राहणाऱ्या मित्राला फोन केला. त्यावेळी त्याने मला कॅनडामध्ये स्थायिक हो असा सल्ला दिला. हल्ली बरेच लोक कामाच्या निमित्ताने कॅनडामध्ये येत आहेत आणि त्यातील बहुतांश भारतीय आहेत. त्यानंतर मला असं वाटलं की, माझे नशीब मला साथ देत नाही. त्यासाठी मला काही तरी करणं गरजेचे आहे. मी तिथे कॅनडामध्ये गेलो. नागरिकत्वासाठी अर्ज केला आणि ते मिळाले.” असे अक्षयने त्यावेळी सांगितले होते, पण आता मात्र अक्षयला भारतीय नागरिकत्व प्राप्त झाले आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshay kumar now officially an indian gets indian citizenship shares proof on twitter nrp
Show comments