बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा ‘ओह माय गॉड’ चित्रपट चांगलाच गाजला होता. ११ ऑगस्ट रोजी या चित्रपटाचा सिक्वेल ‘ओह माय गॉड २’ प्रदर्शित झाला. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांना या चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. याबरोबरच सेन्सॉर कात्रीत अडकल्यानेही चित्रपटाची भरपूर चर्चा झाली.
सनी देओलचा ‘गदर २’सारखा मोठा चित्रपट समोर असतानाही ‘ओएमजी २’ने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. पहिल्याच दिवशी १० कोटींची कमाई करणाऱ्या या चित्रपटाची दिवसागणिक होणारी कमाई वाढू लागली. सोमवारी चित्रपटाच्या कमाईत घट जरी झाली असली तरी १५ ऑगस्ट या सुट्टीच्या दिवशी चित्रपटाने १७.१० कोटींची कमाई करत एक नवा रेकॉर्ड बनवला आहे.
आणखी वाचा : ‘डॉन ३’साठी रणवीरच्या निवडीवरून होणाऱ्या टिकेबद्दल फरहान अख्तरने केलं वक्तव्य; म्हणाला, “जेव्हा…”
सध्या हाती आलेल्या ‘सॅकनिक’च्या रिपोर्टनुसार ‘ओह माय गॉड २’ने जगभरात एकूण १०० कोटींच्या कमाईचा टप्पा पार केला आहे. भारतात या चित्रपटाने ८० कोटींचा व्यवसाय केला आहे. चित्रपट समीक्षक आणि ट्रेड एक्स्पर्ट तरण आदर्श यांनीही याबद्दल ट्वीट करत कौतुक केलं आहे. प्रेक्षकांनी या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद दिला आहे.
लैंगिक शिक्षणावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डने ‘ए सर्टिफिकेट’ दिलं, पण तरी हा चित्रपट लहान मुलांसाठी असल्याचा दावा यातील कलाकार आणि प्रेक्षक करत आहेत. या चित्रपटाच्या निर्मात्यांना सेन्सॉर बोर्डाकडून २० कट सुचवण्यात आले होते. यापूर्वी हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार होता. रिपोर्ट्सनुसार, ‘जिओ सिनेमा’बरोबर निर्माते डील करत होते. कदाचित ९० कोटींना हा करार होणार होता, पण नंतर अचानक हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला.