अक्षय कुमारचा यंदाचा एकमेव हिट चित्रपट ‘ओएमजी 2’ ओटीटीवर दाखल झाला आहे. हा चित्रपट आता प्रेक्षकांना नेटफ्लिक्सवर पाहता येईल. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अक्षयने म्हटलं की हा चित्रपट खरोखरच मुलांसाठी बनविला गेला आहे, परंतु सेन्सॉर बोर्डाकडून ‘ओनली अडल्ट्स’ सर्टिफिकेट मिळाल्यामुळे मुलांना तो पाहता येणार नाही. तसेच हा चित्रपट एका खऱ्या घटनेवर आधारित आहे, एका मुलाला खरोखरंच शाळेतून काढून टाकण्यात आले होते, असं अक्षयने नमूद केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मी आतापर्यंत १५० चित्रपट केले आहेत आणि…”, ‘मिशन रानीगंज’ फ्लॉप झाल्यावर अक्षय कुमारचे विधान

पैसे कमवण्याच्या उद्देशाने सामाजिक विषयांवर चित्रपट बनवत नसल्याचं अक्षय म्हणाला. “माझ्या समाजाला परत देण्याचा हा माझा मार्ग आहे. मला माहित आहे की जर मी ‘सिंग इज किंग’, ‘सूर्यवंशी’ किंवा ‘राउडी राठौर’ असा एकही चित्रपट केला तर मी ३-४ पट जास्त कमवेन. पण मी ‘पॅडमॅन’, ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ आणि ‘एअरलिफ्ट’ सारखे चित्रपट बनवतो, कारण त्यात एक चांगला सामाजिक संदेश आहे. मी पैशांसाठी चित्रपट करत नाही. मला माहित असतं की हे चित्रपट जास्त व्यवसाय करणार नाहीत, पण तरीही मी ते बनवतो.”

अक्षय कुमारने पान मसाल्याच्या जाहिरातीवर दिलं स्पष्टीकरण, म्हणाला, “अशा उत्पादनांचं जाहीरपणे…”

अक्षय कुमार पुढे म्हणाला, “कुणी हस्तमैथुन आणि लैंगिक शिक्षणावर चित्रपट बनवण्याचे धाडस केले आहे का? इथे किंवा हॉलीवूडमध्ये कोणी यावर चित्रपट बनवला आहे का ते तुम्ही मला सांगा. मी तो चित्रपट (ओएमजी 2) मुलांसाठी बनवला आहे. हा मुलांना दाखवायचा चित्रपट आहे. पण दुर्दैवाने, तो दाखवता येऊ शकत नाही कारण त्याला अडल्ट सर्टिफिकेट देण्यात आलं आणि त्यात अडल्ट काहीच नाही.”

दरम्यान, ‘ओएमजी २’ चित्रपटाचे जे व्हर्जन चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाले होते, तेच नेटफ्लिक्सवर प्रसारित करण्यात आले आहे, असंही अक्षयने सांगितलं. खरं तर ओटीटीवर सेन्सॉर नसलेले चित्रपटाचे व्हर्जन दाखवण्याचा पर्याय होता पण आपण सेन्सॉर बोर्डाच्या प्रमाणपत्राचा आदर करणे निवडले, असं अक्षय म्हणाला.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshay kumar on omg 2 ask anyone has dared to make film about masturbation and sex education hrc
Show comments