अभिनेता अक्षय कुमार हा खिलाडी कुमार म्हणून ओळखला जातो. तो सतत आपल्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. काही काळापासून त्याचे सलग चित्रपट फ्लॉप झाल्याने त्याला अनेकदा ट्रोलदेखील केले जाते. आता अक्षय कुमारने याविषयी भाष्य केले आहे.

‘गल्लाटा प्लस’ला दिलेल्या मुलाखतीत अक्षय कुमारने म्हटले आहे की, मी जर वर्षात फक्त दोनच चित्रपट केले, तर त्याची काय खात्री आहे की, ते दोन्ही चित्रपट ब्लॉकबस्टर ठरतील. अक्षय कुमार वर्षाला तीन ते चार चित्रपटांद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. मात्र, त्याचे सलग चित्रपट बॉक्स ऑफिसवर आदळल्यानंतर अनेक टीका करणाऱ्यांनी त्याला इतके चित्रपट करण्यापेक्षा चांगली कथा असलेले चित्रपट निवडण्याचा सल्ला दिला होता. त्याच्या या कठीण काळात एका व्यक्तीने दिलेला सल्ला

Kiran Mane
“डोळ्यात पाणी आलं…”, किरण माने यांनी सांगितली ‘ती’ आठवण; म्हणाले, “माझ्यासारख्या मराठी अभिनेत्याला…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
kangana ranaut emergency movie ban in bangladesh
कंगना रणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटावर बांगलादेशने घातली बंदी, ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
akshay kumar filing kite with paresh rawal
Video : ‘भूत बंगला’च्या सेटवर अक्षय कुमारने उडवली पतंग; तर परेश रावल यांनी धरली फिरकी, व्हायरल झाला व्हिडीओ
kartik aaryan got degree after 10 years
Video : कार्तिक आर्यनला दहा वर्षानंतर मिळाली इंजिनिअरिंगची पदवी; व्हिडीओ शेअर करत अभिनेता म्हणाला, “बॅकबेंचरपासून ते…”
Shahrukh Khan And Manisha koirala
“त्याच्या फ्लॅटमध्ये चटई अंथरलेली असे अन्…”; मनीषा कोईरालाने सांगितली शाहरुख खान स्टार होण्यापूर्वीच्या दिवसांची आठवण
javed akhtar got Asian culture award
जावेद अख्तर यांचा २१ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात सन्मान, ‘हा’ पुरस्कार मिळाल्यावर म्हणाले, “हल्लीच्या चित्रपटांमध्ये…”

‘गल्लाटा प्लस’ला दिलेल्या मुलाखतीत अक्षय कुमारने म्हटले आहे की, मी जर वर्षात फक्त दोनच चित्रपट केले, तर त्याची काय खात्री आहे की, ते दोन्ही चित्रपट ब्लॉकबस्टर ठरतील. अक्षय कुमार वर्षाला तीन ते चार चित्रपटांद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. मात्र, त्याचे सलग चित्रपट बॉक्स ऑफिसवर आदळल्यानंतर अनेक टीका करणाऱ्यांनी त्याला इतके चित्रपट करण्यापेक्षा चांगली कथा असलेले चित्रपट निवडण्याचा सल्ला दिला होता. त्याच्या या कठीण काळात एका व्यक्तीने दिलेला सल्ला

‘गल्लाटा प्लस’ला दिलेल्या मुलाखतीत अक्षय कुमारने म्हटले आहे की, मी जर वर्षात फक्त दोनच चित्रपट केले, तर त्याची काय खात्री आहे की, ते दोन्ही चित्रपट ब्लॉकबस्टर ठरतील. अक्षय कुमार वर्षाला तीन ते चार चित्रपटांद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. मात्र, त्याचे सलग चित्रपट बॉक्स ऑफिसवर आदळल्यानंतर अनेक टीका करणाऱ्यांनी त्याला इतके चित्रपट करण्यापेक्षा चांगली कथा असलेले चित्रपट निवडण्याचा सल्ला दिला होता. त्याच्या या कठीण काळात एका व्यक्तीने दिलेला सल्ला त्याला आजही आठवतो. हा सल्ला दुसऱ्या-तिसऱ्या कोणी नाही, तर बिग बींनी त्याला दिला होता.

‘गल्लाटा प्लस’वर भारद्वाज रंगन यांच्याशी बोलताना अक्षय कुमारने म्हटले आहे की, मी १२ दिवस ओएमजी २ (OMG 2) च्या शूटिंगसाठी दिले. कारण- मी एका सहायक भूमिकेत काम करत होतो. त्यानंतर ४५ दिवस मी ‘जॉली एलएलबी ३’साठी दिले. अक्षय म्हणतो, जर माझी गरज नसेल, तर मी स्वत:ला निर्माते किंवा दिग्दर्शक यांच्यावर लादू शकत नाही. नुकत्याच फ्लॉप झालेल्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चित्रपटासाठी मी पूर्ण ८० दिवस दिले. त्याने काय साध्य झाले?

हेही वाचा : Anant Ambani Wedding: “चोली के पिछे क्या है…”, अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्यात माधुरी दिक्षितच्या हटके डान्सने वेधलं लक्ष

“माझे चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर काही लोक आनंद साजरा करतात.”

याविषयी अधिक बोलताना तो म्हणतो की, मी लोकांना चित्रपट निवडून काम करताना पाहिलं आहे; पण त्यांचे चित्रपटही फ्लॉप होताना पाहिले आहेत. आपल्या इंडस्ट्रीमध्ये काय होते, जर आपण सतत फ्लॉप चित्रपट देत राहिलो, तर लोक आपल्याला काम देत नाहीत. तुम्ही अमिताभ बच्चन यांच्याकडे बघा. त्यांनी मला एकदा म्हटले होते की, काम करणे कधी सोडू नकोस. कायम काम करीत राहा. हे मी त्यांच्याकडून शिकलो आहे. तुमचे गणित चुकू शकते; पण जोपर्यंत तुमच्याकडे प्रामाणिकपणा, सर्जनशीलता आहे तोपर्यंत तुमचे भाग्य बरोबर आहे, यावर विश्वास ठेवा आणि या प्रवासात मी हेच शिकलो आहे. पुढे बोलताना त्याने म्हटले आहे की, इंडस्ट्रीमध्ये राजकारणसुद्धा असते. मी नाव घेत नाही; पण असे अनेक लोक आहेत; जे माझे चित्रपट चालले नाहीत, फ्लॉप ठरले, तर ते आनंद साजरा करतात.

अक्षय कुमार नुकताच त्याच्या सरफिरा या त्याच्या १५० व्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आता हा चित्रपट प्रेक्षकांना भुरळ घालणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader