अभिनेता अक्षय कुमार व रवीना टंडन यांची लव्ह स्टोरी आणि ब्रेकअप हे बॉलिवूडमधील चर्चेतलं प्रकरण आहे. दोघांच्या ब्रेकअपला दोन दशकांपेक्षा जास्त काळ उलटला आहे, त्यानंतर दोघांनीही वेगवेगळ्या व्यक्तींशी लग्नगाठ बांधली व आयुष्यात पुढे गेले. ब्रेकअपनंतर इतक्या वर्षांनी पहिल्यांदाच रवीना व अक्षय यांना एकत्र पाहण्याची संधी चाहत्यांना मिळाली.

हेही वाचा – ‘The Kerala Story’च्या कमाईत तिसऱ्या दिवशी मोठी वाढ; जमवला तब्बल ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

lakhat ek amcha dada fame nitish chavan dance with Mahesh Jadhav and swapnil kinase
Video: प्रेमिका ने प्यार से…; ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील सूर्यादादाचा काजू, पुड्याबरोबर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
aayushman khurana
आयुष्मान खुरानाचा ताहिराबरोबर झाला होता ब्रेकअप; ‘हे’ होते कारण, अभिनेत्याने स्वत:चं केला खुलासा
actor himansh kohli wedding photos out
बॉलीवूड अभिनेत्याने मंदिरात साधेपणाने केलं अरेंज मॅरेज; लग्नातील फोटो आले समोर
marathi actress wedding photo
‘पुन्हा सही रे सही’ नाटकातील अभिनेत्रीचं थाटामाटात पार पडलं लग्न! यापूर्वी लोकप्रिय मालिकेत साकारलेली भूमिका, पाहा फोटो
shatrughan sinha cheated on poonam sinha
“पत्नीने मला एकदा रंगेहात पकडलं होतं…”, शत्रुघ्न सिन्हांनी स्वतःच केलेला खुलासा, म्हणाले होते…
Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”
sussane khan share photo of son hridaan and hrehaan
हृतिक रोशन-सुझान खानची मुलं झाली मोठी, फोटो पाहून चाहते म्हणाले, “ते बॉलीवूडचे…”

रवीना टंडन व अक्षय कुमार यांनी एका अवॉर्ड शोला हजेरी लावली. यावेळी ते दोघेही मंचावर एकत्र दिसले. इतकंच नव्हे तर त्यांनी एकमेकांना मिठी मारून भेट घेतली व ते गप्पा मारतानाही दिसले. या शोमध्ये अक्षय कुमारला ‘मोस्ट स्टायलिश मॅन २०२३’ चा पुरस्कार देण्यात आला. ते देण्यासाठी रवीना टंडन मंचावर आली. अक्षय पुरस्कार घेण्यासाठी मंचावर आला, त्यावेळी त्याने रवीनाला मिठी मारली. यानंतर रवीनाने अक्षय कुमारला हा पुरस्कार प्रदान केला.

अक्षय कुमार आणि रवीना टंडनचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोघे एकत्र गप्पा मारताना दिसत आहेत. यात रवीना अक्षयला काहीतरी म्हणते तिथे अक्षय मान हलवून हो म्हणताना दिसतो.

अक्षय आणि रवीना १९९४ मध्ये आलेल्या ‘मोहरा’ चित्रपटात एकत्र दिसले होते. यानंतर १९९५ मध्ये त्यांच्या डेटींगच्या बातम्या खूप चर्चेत होत्या. दोघांनी मंदिरात साखरपुडा केल्याचीही बातमी समोर आली होती. पण हे नातं फार काळ टिकलं नाही. अक्षयची रेखा यांच्याशी जवळीक वाढल्याच्या चर्चा होत्या. रवीनाला हे अजिबात आवडलं नव्हतं, त्यानंतर तिचं रेखा यांच्याशी भांडणही झाल्याचं म्हटलं जातं. ब्रेकअपनंतर रवीना आणि अक्षय कधीही एकत्र दिसले नाहीत. पण या शोच्या निमित्ताने त्यांच्या चाहत्यांना या दोघांना इतक्या वर्षांनंतर एकत्र पाहता आलं.