हमास व इस्रायल दरम्यान युद्ध सुरू आहे. हमास या दहशतवादी संघटनेने शनिवारी पहाटे इस्रायलवर हल्ला केला. त्यानंतर युद्ध सुरू झालं. सध्या सीमेवर हमास व इस्रायलच्या लष्करादरम्यान युद्ध सुरू आहे. या हल्ल्यात आतापर्यंत शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तसेच हजारो जखमी आहेत. या युद्धावर अक्षय कुमारने प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अक्षय कुमारने पान मसाल्याच्या जाहिरातीवर दिलं स्पष्टीकरण, म्हणाला, “अशा उत्पादनांचं जाहीरपणे…”

“कोणत्याही प्रकारचा दहशतवाद चुकीचाच आहे. जे घडतंय ते खूप दुःखद आहे. मला आशा आहे की हे युद्ध थांबेल आणि परिस्थिती सामान्य होईल. सध्या मी एवढीच प्रार्थना करू शकतो,” असं ‘टाईम्स नाऊ’शी बोलताना अक्षय कुमार म्हणाला. या देशातील युद्धासारख्या परिस्थितीचा निषेध लोक करत नाहीयेत, याबाबत अक्षय कुमारला विचारण्यात आलं. उत्तर देत तो म्हणाला, “मी म्हणालो की कोणत्याही प्रकारचा दहशतवाद चुकीचाच आहे. लोकांना मारणे हे कोणत्याच गोष्टीचे उत्तर असू शकत नाही. याबद्दल चर्चा करा आणि मार्ग काढा. मी मुलं आणि महिलांच्या हत्येचा तीव्र निषेध करतो.”

“कोणाच्या बापाची हिंमत नाही की…”, अक्षय कुमार स्पष्टच बोलला; म्हणाला, “सगळे मला…”

इस्रायलमधून युद्धाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर येत आहेत. याठिकाणी महिला अत्याचाराच्या घटनाही उघडकीस आल्या आहेत. अशातच “इस्रायल युद्धाशी दोन हात करत आहे. हे युद्ध आम्हाला नको होतं. पण अत्यंत क्रूर आणि हिंसक मार्गाने हे युद्ध आमच्यावर लादण्यात आलं आहे. पण हे युद्ध इस्रायलनं सुरू केलं नसलं तरी याचा शेवट आम्हीच करणार आहोत,” असं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटलं आहे.