अक्षय कुमारचे गेल्या काही वर्षांमध्ये प्रदर्शित झालेले चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलेच आपटले. प्रेक्षकांनी अक्षरशः अक्षयच्या चित्रपटांकडे पाठ फिरवली. आता त्याचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘सेल्फी’ असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याला अक्षयने हजेरी लावली होती. यावेळी त्याने चित्रपटांसाठी त्याला मिळत असलेल्या मानधनाबाबत भाष्य केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा – २४०० रुपयांना विकलं जातंय शाहरुख खानच्या ‘पठाण’चं तिकिट, तरीही शो हाऊसफुल कारण….

‘सेल्फी’ चित्रपटामध्ये अक्षयसह इमरान हाश्मी, नुसरत भरुचा, डायना पेंटी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा अॅक्शन-कॉमेडी चित्रपट असणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यादरम्यान अक्षयला चित्रपटांसाठी घेत असलेल्या मानधनाबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्याने अगदी मजेशीर अंदाजात उत्तर दिलं.

एका चित्रपटासाठी ५० ते १०० कोटी मानधन जेव्हा तू घेतो तेव्हा तुझी प्रतिक्रिया काय असते? असा प्रश्न एका पत्रकाराने अक्षयला विचारला. यावर उत्तर देत तो म्हणाला, “माझी प्रतिक्रिया चांगलीच असते. पण तुझी यावर प्रतिक्रिया काय? तू मला सांगितलं होतसं की तुला शेरवानी परिधान करण्यास अडचण आहे. शेरवानी परिधान केल्यावर तुला कसं वाटतं?”. असं अक्षयने हसत उत्तर दिलं.

आणखी वाचा – Video : ‘पठाण’साठी सांगली, अमरावतीच्या तरुणांनी बुक केलं संपूर्ण थिएटर, शाहरुख खानही भारावला, म्हणाला, “तुम्हाला…”

पुढे तो म्हणाला, “मला जर मानधन मिळतं तर चांगलच वाटणार ना… ही सकारात्मक गोष्ट आहे. त्यामुळे आनंद झाला पाहिजे. देवकृपेने तुझ्याबरोबरही असंच घडायला हवं.” याआधी अक्षयने ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये माझ्या मानधनामध्ये ३० ते ४० टक्के कमी करणार असल्याचं म्हटलं होतं. आता पुन्हा एकदा अक्षयने त्याच्या मानधनामध्ये वाढ केली आहे का? असा प्रश्न निर्माण होतो.