अक्षय कुमार आणि रवीना टंडन ही ९० च्या दशकातील बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडी. मोठ्या पडद्यावर सह-कलाकार म्हणून सुरुवात करणारे रवीना व अक्षय नंतर खऱ्या आयुष्यात एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी साखरपुडा केला. पण अचानक दोघेही वेगळे झाले. त्यांचा साखरपुडा आणि लग्न मोडलं. त्यानंतर रवीनाने अनिल थडानीशी लग्नगाठ बांधली, तर अक्षयने ट्विंकल खन्नाशी लग्न केलं.

“मी आतापर्यंत १५० चित्रपट केले आहेत आणि…”, ‘मिशन रानीगंज’ फ्लॉप झाल्यावर अक्षय कुमारचे विधान; म्हणाला, “हा चित्रपट…”

Tharla Tar Mag Maha Episode Promo sayali confess love
“तुमच्यावर खूप प्रेम…”, अखेर सायलीने दिली प्रेमाची कबुली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Saif Ali Khan Attacked News
“मध्यरात्री २.३० वाजता…”, सैफ अली खानवर चाकू हल्ला झाल्यावर जवळच्या व्यक्तीचा खुलासा, सांगितला संपूर्ण घटनाक्रम
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Aishwarya And Avinash Narkar dance video
नारकर जोडप्याचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! Video पाहून मराठी अभिनेत्री म्हणते, “हा ग्रुप कसा जॉईन करायचा…”
Sheeba says Sunil Dutt made her method actress
“त्यांनी मला एका कोपऱ्यात बसून रडायला सांगितलं, कोणालाच…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला सुनील दत्त यांच्याबरोबर काम करण्याची आठवण
sonu sood on income tax raid
सोनू सूद आयकर विभागाने घरावर केलेल्या छापेमारीबद्दल झाला व्यक्त; म्हणाला, “माझ्या घरातील कपाटं आणि दरवाजांना…”

अक्षय-रवीनाचं ‘टिप टिप बरसा पानी’ हे गाणं तर आजही तितकंच लोकप्रिय आहे. ‘मोहरा’ व्यतिरिक्त त्यांनी ‘मैं खिलाडी तू अनाडी’ आणि ‘खिलाडियों का खिलाडी’ यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. ब्रेकअपनंतर जवळपास २२ वर्षांत अक्षय आणि रवीनांनी कधीच एकत्र काम केलं नाही, तसेच ते कधीच एकत्र दिसले नाहीत. पण काही महिन्यांपूर्वी एका कार्यक्रमात त्यांची भेट झाली. तिथे त्यांनी मिठी मारून गळाभेट घेतली, नंतर काही दिवसांतच दोघेही एकत्र काम करणार असल्याची घोषणा झाली. ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटात रवीना व अक्षय दोन दशकांपेक्षा जास्त काळानंतर एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.

रवीना टंडनने अक्षय कुमारशी मोडलेल्या साखरपुड्याबद्दल तब्बल २२ वर्षांनी सोडलं मौन; म्हणाली, “त्याच्या आयुष्यातून…”

‘एएनआय’ला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अक्षय कुमारने रवीना टंडनबरोबर काम करण्याबद्दल आणि त्यांच्या ‘टिप टिप बरसा पानी’ या गाण्याबद्दल भाष्य केलं. अक्षय म्हणाला, “आम्ही ‘वेलकम टू द जंगल’ नावाचा चित्रपट करत आहोत, त्यासाठी आम्ही लवकरच शूटिंग सुरू करणार आहोत. ‘टिप टिप बरसा पानी’ हे एक उत्कृष्ट गाणं आहे. आम्ही एकत्र अनेक हिट चित्रपट केले आहेत आणि मी (वेलकम टू द जंगल) शूट सुरू करण्यास उत्सुक आहे. बऱ्याच दिवसांनंतर आम्ही एकाच स्क्रीनवर एकत्र दिसणार आहोत.”

‘वेलकम टू द जंगल’ व्यतिरिक्त अक्षय रोहित शेट्टीच्या आगामी अॅक्शन चित्रपट ‘सिंघम अगेन’मध्ये सूर्यवंशी या पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात त्याची भूमिका खूप लहान असेल. येत्या काही महिन्यांत अक्षय कुमार तमिळ सिनेमा ‘सूराराई पोत्तरू’च्या हिंदी रीमेकमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट १६ फेब्रुवारी २०२४ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय तो टायगर श्रॉफबरोबर ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या अॅक्शन थ्रिलर सिनेमात झळकणार आहे. इतकंच नाही तर त्याच्याकडे हाऊसफूल फ्रेंजायजीचा ‘हाऊसफूल ५’ देखील आहे.

Story img Loader