बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘स्काय फोर्स’चे जोरदार प्रमोशन करत आहे. एका मुलाखतीत त्याला लवकर झोपणं आणि सकाळी लवकर उठणं या त्याच्या शिस्तबद्ध जीवनशैलीबद्दल विचारण्यात आलं. तसेच एकदा विवेक ओबेरॉय आणि रितेश देशमुख हे पाहुणे म्हणून अक्षयच्या घरी गेले होते, पण ते रात्रीचे जेवण करत असतानाही अक्षय रात्री ९.३० वाजता झोपायला गेला होता, असं विवेक म्हणाला होता, ते खरं आहे का? याबाबत त्याने उत्तर दिलं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत अक्षय म्हणाला की तो पाहुण्यांचं आदरातिथ्य खूप चांगल्या पद्धतीने करतो. तसेच घरी आलेल्या पाहुण्यांना तो त्यांच्या कारपर्यंत सोडायला जातो. विवेकचा दावा त्याने फेटाळला. “नाही, मी असं कधीच करत नाही. मी लोकांना त्यांच्या कारपर्यंत सोडतो. मी त्यांना एकटं सोडत नाही,” असं अक्षय म्हणाला. त्यानंतर घरी तो अधूनमधून पार्ट्या ठेवतो, असं अक्षयने सांगितलं. “मी खूप चांगला होस्ट आहे. आमच्या घरी सहसा पार्ट्या होत नाहीत पण जेव्हा आम्ही पार्टीचे आयोजन करतो तेव्हा रात्रीचं जेवण लवकर करण्याचा प्रयत्न असतो. लोक येतात, थोड्या गप्पा मारतात, ज्यांना दारू प्यायची आहे ते पितात आणि मग मी त्यांना त्यांच्या कारपर्यंत सोडायला जातो,” असं अक्षयने सांगितलं.
विवेक ओबेरॉय काय म्हणाला होता?
एंटरटेनमेंट लाइव्हशी बोलताना विवेकने (Vivek Oberoi) अक्षयबरोबर एकदा पहाटे वर्कआउट केल्याचा किस्सा सांगितला होता. अक्षय फिटनेसबद्दल खूप सजग असून तो पहाटे लवकर उठतो, असं विवेक म्हणाला होता. एकदा अक्षयने त्याच्या घरी जेवायला बोलावलं होतं. पण मी व रितेश देशमुख जेवत असतानाच तो झोपायला निघून गेला, असं विवेकने म्हटलं होतं. “अक्षय इतका शिस्तबद्ध आहे की एकदा आम्ही त्याच्या घरी जेवत होतो. घड्याळात रात्रीचे ९:३० वाजले आणि तो वरच्या मजल्यावर गेला. आम्हाला वाटलं की तो वॉशरूमला गेला आहे, पण तो परत खाली आलाच नाही. आम्ही रात्री ११ वाजेपर्यंत त्याची वाट पाहत होतो. नंतर त्याची पत्नी ट्विंकल खन्ना खाली आली आणि आम्हाला म्हणाली, ‘तुम्ही आता घरी जा. तो झोपला आहे!’ तो इतका शिस्तप्रिय आहे,” असं विवेक म्हणाला होता.
अक्षय कुमारने विवेकला केली होती मदत
बॉलीवूडने बॉयकॉट केलं तेव्हा अक्षय मदतीला आला होता, असंही विवेकने सांगितलं होतं. “बॉलीवूडमध्ये एका विशिष्ट वर्गाकडून माझ्यावर बहिष्कार घालण्यात आला होता. माझ्या करिअरची संपूर्णपणे वाट लागली होती. अशातच मला अक्षय कुमारने फोन केला. तेव्हा मी त्याला संपूर्ण परिस्थिती सांगितली. मी प्रचंड मानसिक तणावात असताना तो अवघ्या अर्ध्या तासात माझ्या घरी आला. एवढ्या लगेच अक्षय माझ्या मदतीकरता आल्याने मला सुद्धा आश्चर्य वाटलं होतं. या प्रकरणी स्वत: लक्ष घालून त्याने माझी समजूत काढली आणि मला विविध उपाय सुचवले. त्या क्षणाला माझं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं,” असं विवेक म्हणाला होता.