बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या ‘मिशन रानीगंज’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. मात्र, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने खूप कमी कमाई केली आहे. प्रेक्षकांमध्ये अक्षय कुमारची जादू कमी होताना दिसत आहे. दरम्यान, अक्षय कुमारने नुकत्याच एका मुलाखतीत त्याच्या चित्रपटांबाबत त्याच्या मुलांची काय प्रतिक्रिया असते याबाबतचा खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- Video “माझ्या जादुई दिवसाच्या आठवणी…” सायरा बानोंनी शेअर केला दिलीप कुमार यांच्याबरोबरचा लग्नाचा अनसिन व्हिडीओ

नुकतंच अक्षयने एएनआय पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीत अक्षयने आपल्या करिअरबरोबरच खासगी आय़ुष्याबाबतही अनेक खुलासे केले आहेत. मुलाखतीत अक्षय कुमारला विचारलं होतं की, तुझ्या आईने तुझे चित्रपट पाहिले आहेत का? अक्षय म्हणाला, “तिने माझे सर्व चित्रपट सात ते आठ वेळा पाहिले आहेत. माझ्या वडिलांचे खूप पूर्वी निधन झाले होते, त्यामुळे ते माझे चित्रपट एवढे बघू शकले नाहीत, जेवढे माझ्या आईने बघितले आहेत.”

या मुलाखतीत अक्षयने त्याच्या चित्रपटांबाबत त्याच्या दोन्ही मुलांच्या प्रतिक्रिया काय असतात याबाबतही खुलासा केला. अक्षय म्हणाला, “माझी मुलगी नितारा अजून लहान आहे. पण, माझा मुलगा आरव माझे चित्रपट बघतो. जेव्हा त्याला माझे चित्रपट आवडतात, तेव्हा तो कौतुक करतो आणि म्हणतो, खूपच छान डॅडी. पण, त्याला माझा चित्रपट आवडला नाही तर तो माफ करा डॅडी, पण चित्रपट खूपच बकवास होता”, असे सांगतो.

हेही वाचा- “कुणी हस्तमैथुन, लैंगिक शिक्षणावर चित्रपट बनवण्याचे धाडस केले आहे का?” अक्षय कुमारचा सवाल; म्हणाला, “दुर्दैवाने मुलांना…”

यापूर्वी एका मुलाखतीत अक्षय म्हणाला होता, “मला माझ्या मुलाला चित्रपट दाखवायचे आहेत, त्याला चित्रपटांबद्दल सांगायचे आहे, पण त्याला चित्रपट पाहण्यात अजिबात रस नाही. त्याला फक्त त्याच्या कामात रस आहे. त्याला फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घ्यायचे आहे.”

हेही वाचा- ‘कॉफी विथ करण ८’ मध्ये कार्तिक आर्यन लावणार हजेरी? ‘दोस्ताना २’दरम्यान झालेल्या वादावर करणार भाष्य

अक्षयच्या चित्रपटांबाबत बोलायचं झालं तर गेल्या काही महिन्यांपासून त्याचे सगळेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होताना दिसत आहेत. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेला अक्षय कुमारचा ‘ओ माय गॉड २’ चित्रपटही बॉक्स ऑफिसवर आपटला होता. आता त्याचा ‘मिशन रानीगंज’ही आपली जादू दाखवू शकला नाही. जगभरात या चित्रपटाने २२ कोटींची कमाई केली आहे, तर भारतात या चित्रपटाने केवळ १८.५ कोटींचा गल्ला जमवला आहे. घटती कमाई पाहता निर्मात्यांनी या चित्रपटाला एका तिकिटावर एक तिकीट फ्री अशी ऑफरही दिली आहे. मात्र, या ऑफरचा कोणताच लाभ होताना दिसत नाहीये.