Akshay Kumar News : बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार त्याच्या अभिनयासह खासगी आयुष्यामुळे देखील अनेकदा चर्चेचा विषय ठरला आहे. अक्षय कुमारचे पत्नी ट्विंकल खन्नाबरोबरचे अनेक किस्से आजवर व्हायरल झाले आहेत. दोघांची जोडी बॉलीवूडमधील बेस्ट कपल म्हणून ओळखली जाते. असे असले तरी अक्षय कधीच त्याच्या पत्नीला चित्रपटाच्या स्क्रीनिंगला बरोबर घेऊन येत नाही. याचे कारण सांगताना अक्षयने नुकताच एक किस्सा सांगितला आहे.

अक्षय कुमारने नुकतील हिंदुस्तान टाइम्सला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्याला ट्विंकलला चित्रपटाच्या स्क्रीनिंगवेळी सोबत का आणत नाही? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी यावर उत्तर देताना अक्षय म्हणाला की, “मी माझ्या पत्नीच्या प्रत्येक मताचा आदर करतो. ती माझ्या कामावर तिचं मत स्पष्टपणे मांडते. त्यामुळे आम्ही दोघेही स्क्रीनिंगला एकत्र न जाता घरीच एकत्र चित्रपट पाहतो.” असं सांगत पुढे अक्षयने एक किस्सा सांगितला आहे. तो पुढे म्हणाला की, “मी ट्विंकलबरोबर पहिल्यांचाद एका चित्रपटाच्या स्क्रीनिंगला गेलो होतो. त्यावेळी ट्विंकल हा चित्रपट फार बकवास आहे असं म्हणाली. त्यावेळी त्या चित्रपटाचे निर्मातेदेखील तिथं होते. तिचं हे बोलणं त्यांनी ऐकलं होतं. त्यानंतर त्यांनी पुन्हा माझ्याबरोबर एकही चित्रपट केला नाही.”

shakti kapoor
“माफी मागितली…”, शक्ती कपूर यांच्याबरोबर लग्न करण्यासाठी शिवांगी कोल्हापूरेंनी सोडलेले करिअर; अभिनेते म्हणाले, “त्या गोष्टीचा तिला खूप…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
kangana ranaut emergency movie ban in bangladesh
कंगना रणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटावर बांगलादेशने घातली बंदी, ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय
trinidha rao nakkina apologize anshu ambani
आधी अभिनेत्रीच्या शरीराबद्दल केलं आक्षेपार्ह विधान, नंतर दिग्दर्शकाने मागितली माफी; अंशू अंबानी प्रतिक्रिया देत म्हणाली…
Tharla Tar Mag Fame Actors Dance Video
“मुझको क्या हुआ है…”, ‘ठरलं तर मग’ फेम चैतन्य अन् कुसुमचा शाहरुख खानच्या गाण्यावर जबरदस्त डान्स! कमेंट्सचा पाऊस…
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
marathi actress abhidnya bhave shares screen with abhishek bachchan
अभिषेक बच्चनसह जाहिरातीत झळकली ‘ही’ मराठी अभिनेत्री! ‘रंग माझा वेगळा’मध्ये साकारलेली खलनायिकेची भूमिका, ओळखलंत का?
Shahrukh Khan And Manisha koirala
“त्याच्या फ्लॅटमध्ये चटई अंथरलेली असे अन्…”; मनीषा कोईरालाने सांगितली शाहरुख खान स्टार होण्यापूर्वीच्या दिवसांची आठवण

हेही वाचा : ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत मोठा ट्विस्ट; शालिनीचा मृत्यू होणार? पाहा प्रोमो

तसेच पुढे अक्षयने आपल्या पत्नीच्या टिप्पणीबद्दल त्याला काय वाटते हेदेखील आवर्जून येथे सांगितले. तो म्हणाला की, “ट्विंकलला एखादा चित्रपट आवडला की, ती त्याचं भरपूर कौतुक करते. मात्र, तिला काही गोष्ट न आवडल्यास ती लगेचच त्यावर कठोर शब्दांत व्यक्त सुद्धा होते. हा सीन चांगला नाही, क्लायमेक्स फार जास्त आहे, असे तिला वाटेल ते ती बिंधास्त सांगत असते. ट्विंकल माझ्या प्रत्येक चित्रपटावर तिचं प्रामाणिक मत व्यक्त करते. तिच्या मताचा मला नेहमीच फायदा होतो.”, असं अक्षय कुमार म्हणाला.

“माझा ‘खेल खेल में’ चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा ट्विंकलनं तो पाहून तिचं मत मला सांगितलं होतं. हा चित्रपट तिला फार जास्त आवडला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली नव्हती. मात्र तिच्या मनात हा चित्रपट त्यावेळी हिट ठरला होता.”, असं सांगत अक्षयने पुढे ट्विंकल खन्नाचे कौतुकदेखील केले.

हेही वाचा : इजिप्तच्या लॉगिना सलाहने रचला इतिहास; त्वचारोग असूनही मिस युनिव्हर्स स्पर्धेत केली चमकदार कामगिरी

अक्षय कुमारला आजही बॉलीवूडचा खिलाडी म्हणून ओळखले जाते. त्याने सिनेविश्वाला आजवर अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. सध्या अक्षयच्या हातात आगामी सहा चित्रपट आहेत. लवकरच त्याचा ‘जॉली एलएलबी ३’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय कुमार, सुनिल शेट्टी आणि परेश रावल यांच्या त्रिकुटाने ‘हेराफेरी’ आणि ‘फिर हेराफेरी’ हे दोन्ही चित्रपट तुफान गाजवले. यात अक्षयने राजू हे पात्र साकारलं आहे. चित्रपटातील त्याचा प्रत्येक कॉमेडी सिन आजही प्रेक्षक आवडीने पाहतात आणि खळखळून हसतात. आता अक्षयच्या चाहत्यांना तो ‘हेरा फेरी ३’मध्ये काय धमाल करणार हे पाहण्याची उत्सुकता लागली आहे.

Story img Loader