बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारचे मागच्या ३-४ वर्षांत आलेले बरेच चित्रपट फ्लॉप झाले आहेत. त्याचा नुकताच आलेला ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ बॉक्स ऑफिसवर सपशेल आदळला. अभिनेता सध्या त्याच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अक्षयने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल व त्याच्या मुलाबद्दल माहिती दिली आहे.

अक्षय कुमार व ट्विंकल खन्ना यांचा मुलगा आरव २१ वर्षांचा आहे. तो मागच्या सहा वर्षांपासून परदेशात शिक्षणानिमित्त एकटा राहतो. तर त्यांची मुलगी नितारा मुंबईत आई-वडिलांबरोबर राहते. आरव अभ्यासात खूप हुशार असून युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमध्ये आपलं शिक्षण पूर्ण करतोय.

Raj Babbar daughter knew about his relationship with Smita Patil since she was 7
“ही ती स्त्री आहे जिच्याबरोबर…”, स्मिता पाटील यांच्याबद्दल काय म्हणाली राज बब्बर यांची मुलगी?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Gashmeer Mahajani
“परत तिच्या कुशीत…”, गश्मीर महाजनी आईबद्दल बोलताना म्हणाला, “घरी दोन लहान मुलं…”
Neena Gupta aunt threw her out after daughter Masaba birth
लग्न न करता झालेली आई, एकदा काकूने अचानक मध्यरात्री…; बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली…
Ajit Pawar
Ajit Pawar On Loan Waiver : अजित पवारांचं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल मोठं विधान; म्हणाले, “माझ्या भाषणात कधी तुम्ही…”
ram kapoor
श्रीमंत वडिलांनी पैसे पाठवणं बंद केलं अन्…; प्रसिद्ध अभिनेता संघर्षाचे दिवस आठवत म्हणाला, “सेकंड हॅण्ड…”
sonu sood on income tax raid
सोनू सूद आयकर विभागाने घरावर केलेल्या छापेमारीबद्दल झाला व्यक्त; म्हणाला, “माझ्या घरातील कपाटं आणि दरवाजांना…”
when sanjay kapoor slapped madhuri dixit in raja movie
“संजय कपूरने माधुरी दीक्षितला झापड मारल्यावर…”, दिग्दर्शकाने सांगितली ‘ती’ आठवण; म्हणाला, “मला वाटलं माझं करिअर संपलं”

अमिताभ, जया व रेखा लाँग ड्राइव्हवर जायचे एकत्र; ‘ते’ दोघेही पुढच्या सीटवर बसायचे अन् मागे…

अक्षयने शिखर धवनच्या ‘धवन करेंगे’ या नवीन शोमध्ये हजेरी लावली. यावेळी त्याने सांगितलं की त्याचा मुलगा आरवने १५ व्या वर्षी परदेशात शिकायला जाण्यासाठी घर सोडलं. “माझा मुलगा आरव युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमध्ये शिकत आहे. त्याने वयाच्या १५ व्या वर्षी घर सोडलं. त्याला अभ्यासाची आधीपासूनच खूप आवड होती आणि त्याला एकटं राहायचं होतं. त्याने घरापासून लांब जावं अशी माझी इच्छा नव्हती, पण जाण्याचा निर्णय त्याचा होता आणि मी त्याला थांबवू शकलो नाही कारण मी १४ व्या वर्षी माझं घर सोडलं होतं,” असं अक्षय कुमार म्हणाला.

करीना-तब्बू-क्रितीची जुगलबंदी OTT वर पाहता येणार; या वीकेंडला प्रदर्शित होणाऱ्या कलाकृती कोणत्या? वाचा नावं

सगळी कामं स्वतः करतो आरव

अक्षयचा मुलगा आरव खूप साधेपणाने जगतो. आई- वडिलांचं घर सोडून एकटा राहत असला तरी तो स्वतःची कामं स्वतःच करत असल्याचं अक्षयने सांगितलं. “तो स्वतःचे कपडे स्वतः धुतो, तो छान जेवण बनवतो. तो भांडीदेखील स्वतःच घासतो. त्याला जास्त महाग कपडे घ्यायला आवडत नाही. तो स्वस्त कपडे घेतो. तो सेकंड हँड स्टोअरमधून खरेदी करतो, त्याला पैसे वाया घालवायला आवडत नाही,” असं अक्षय कुमार म्हणाला.

अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम आहे का? मुलाखतीत थेट विचारलेल्या प्रश्नावर रेखा म्हणाल्या होत्या…

आरवला चित्रपटांत काम करण्याची आवड नाही – अक्षय कुमार

अक्षय कुमार म्हणाला की आरवला चित्रपटसृष्टीत यायचं असेल तर त्याच्यासाठी ते खूप सोपं आहे. कारण त्याचे आई-वडील आणि आजी-आजोबा सर्वच या इंडस्ट्रीचा एक भाग आहेत. असं असलं तरी आरवला मात्र चित्रपटांमध्ये काहीच रस नसल्याचं अक्षयने नमूद केलं.”आम्ही त्याला कधीही कोणतीही गोष्ट करायला भाग पाडलं नाही. त्याला फॅशन आवडते, पण त्याचा चित्रपटांमध्ये काम करायचं नाही. एकदा तो माझ्याकडे आला आणि म्हणाला मला चित्रपट करायचे नाहीत. मी म्हटलं हे तुझं आयुष्य आहे, तुला जे करायचं ते कर,” असं अक्षय म्हणाला.

Story img Loader