बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘ओह माय गॉड’ या चित्रपटाचा दुसरा भाग नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटातून लैंगिक शिक्षणाचे महत्त्व सांगण्यात आले आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमारने भगवान शंकराची भूमिका साकारली आहे. सध्या या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

हा चित्रपट प्रदर्शनाच्या आधीच वादाच्या भोवऱ्यात अडकला. ‘आदिपुरुष’च्या बाबतीत जी चूक घडली तशी चूक यावेळी घडू नये यासाठी सेन्सॉर बोर्डाने अधिक दक्षता घेतली. ‘ओह माय गॉड २’मध्ये तब्बल २७ बदल सुचवल्याचं ऐकिवात होतं, याबरोबरच चित्रपटाला मिळालेलं ‘ए सर्टिफिकेट’ यामुळेसुद्धा बऱ्याच लोकांचा हिरोमोड झाला. परंतु आता चित्रपट प्रदर्शित झाल्यावर हा चित्रपट लहान मुलांना अवश्य दाखवायला पाहीजे अशा प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत.

Shiva
Video : “तू दे होकार, मला तेच…”, आशूची नाराजी दूर करण्याची शिवाची हटके स्टाईल; मालिकेत पुढे काय होणार?
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Tula Shikvin Changalach Dhada Promo
अक्षराच्या माहेरी पोहोचली भुवनेश्वरी! अधिपतीला फोन केला अन् सुनेला दिलं खुलं आव्हान…; मालिकेत काय घडणार? पाहा प्रोमो
SHIVA
Video : “तू कुठल्या अधिकाराने…”, शिवा-आशूमध्ये होणार पुन्हा भांडण; सिताई देणार नातं संपवण्याचा सल्ला, पाहा प्रोमो….
Lakshami Niwas
Video: लक्ष्मी सिद्धूला घरी बोलवणार, त्याची व भावनाची भेट होणार का? पाहा ‘लक्ष्मी निवास’ मालिकेचा प्रोमो
yeh jawaani hai deewani Ranbir Deepika romantic movie collection
YJHD : ११ वर्षांनी पुन्हा प्रदर्शित झाला रणबीर-दीपिकाचा रोमँटिक चित्रपट! फक्त ३ दिवसांत कमावले तब्बल ‘इतके’ कोटी
Paaru
Video: पारूचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर पद आदित्य वाचवू शकणार का? मालिकेत पुढे काय घडणार? पाहा प्रोमो
Zomato Zepto Swiggy field workers have no legal rights
किती काळ पायदळीच तुडवले जाणार? ‘१० मिनिटांत घरपोच’ देणाऱ्यांचे हक्क

आणखी वाचा : आध्यात्मिक गुरूंच्या आश्रमात रजनीकांत यांनी लावली हजेरी; ‘जेलर’च्या अभूतपूर्व यशावर केलं भाष्य

नुकतंच चित्रपटातील मुख्य अभिनेता अक्षय कुमारनेही याबाबत खंत व्यक्त केली आहे. १५०० हून अधिक स्क्रीन्सवर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे आणि एकूणच प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहण्यासाठी अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी वेगवेगळ्या चित्रपटगृहात जात आहेत. याचदरम्यान अक्षयने यावर भाष्य केलं. अक्षय म्हणाला, “याला ‘ए सर्टिफिकेट द्यायची काहीच गरज नव्हती. लहान मुलांसाठी केलेला हा माझा पहिला अॅडल्ट चित्रपट आहे याचंच आश्चर्य मला वाटतंय. हा चित्रपट पौगंडावस्थेतील मुलांसाठीच बनवला आहे. प्रत्येक शाळेत प्रत्येक विद्यार्थ्याला हा चित्रपट दाखवला गेला पाहिजे.”

अक्षय कुमारची ही प्रतिक्रिया सध्या चांगलीच चर्चेत आहे. ‘ओएमजी २’ला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. सनी देओलचा ‘गदर २’ समोर असूनसुद्धा प्रेक्षक अक्षयच्या चित्रपटासाठी गर्दी करत आहेत. लैंगिक शिक्षण आणि हस्तमैथुनसारख्या गंभीर विषयांवर यातून भाष्य करण्यात आलं आहे. यात अक्षय कुमारसह पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.

Story img Loader