Akshay Kumar sold off his office space : बॉलीवूडमध्ये अभिनेता अक्षय कुमारला खिलाडी कुमार म्हणून ओळखले जाते. अभिनेत्याची प्रमुख भूमिका असलेला ‘केसरी २’ सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र अक्षय कुमार सध्या त्याच्या चित्रपटामुळे नाही तर त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.

अक्षय कुमारला ५ वर्षांत झाला तब्बल ‘इतक्या’ कोटींचा फायदा

अक्षय कुमारने त्याचे ऑफिस विकले आहे. अभिनेत्याने त्याचे लोअर परळमधील ऑफिस विकले आहे. स्क्वेअर यार्ड्सकडे असलेल्या कागदपत्रांनुसार हा व्यवहार हा एप्रिल महिन्यात झाला आहे. या ऑफिसचे क्षेत्रफळ हे १. १४६. ८८ कोटी इतके असून त्याल दोन कार पार्किंगची जागादेखील आहे. हा व्यवहार करताना स्टॅम्प ड्युटी ४८ लाख भरावी लागली. तर ३० हजार नोंदणी फी भरावी लागली.

अक्षय कुमारने ही जागा २०२० मध्ये खरेदी केली होती. अभिनेत्याने डिसेंबर २०२० मध्ये ४. ८५ कोटी रुपयांना विकत घेतले होते. आता त्याने ही मालमत्ता ८ कोटींना विकली आहे. त्याला जवळजवळ ६५ टक्के फायदा झाला आहे. लोअर परळ ही मुंबईतील महत्वाचे ठिकाण आहे. या ठिकाणी अभिषेक बच्चन, शाहिद कपूर, अमिश त्रिपाठी, मनोज वाजपेयी अशा अनेक कलाकारांच्या प्रॉपर्टी या ठिकाणी आहेत.

अक्षय कुमारची संपत्ती ही २५०० कोटींच्या आसपास आहे. त्याचा स्वत:चा सी-फेस बंगला आहे. या बंगल्याची किंमत ८० कोटी इतकी आहे. या बंगल्यात होम थिएटर, मोठे गार्डन आहे. याबरोबरच, त्याचे स्वत:चे १८७८ चौरस फुट क्षेत्रफळ असलेले अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटची किंमत ७.८ कोटी इतकी आहे. याशिवाय अक्षय कुमारचा पोर्तुगीज स्टाईल व्हिला आहे. या व्हिलाची किंमत ५ कोटी आहे.

अक्षय कुमारच्या कामाबद्दल बोलायचे तर त्याचा नुकताच स्काय फोर्स हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचे प्रेम मिळाले. विशेष म्हणजे गेल्या काही काळापासून अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटांना अपयश येत होते. मात्र, स्काय फोर्स या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. नुकताच त्याचा केसरी चाप्टर २: द अनटोल्ड स्टोरी ऑफ जालियनवाला बाग हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ७.७५ कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाची ९. ७५ कोटींची कमाई झाली तर तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने १२ कोटींची कमाई केली आहे. आता हा चित्रपट किती कमाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.