सध्या प्रत्येकजण दिवाळी साजरी करण्यात मग्न आहे. कोणी फटाके उडवत, कोणी नातेवाईकांच्या घरी जात, तर कोणी आपल्या घरच्यांबरोबर फराळाचा आनंद घेताना दिसतोय. कलाकारही यात मागे नाहीत. अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या घरच्या लक्ष्मी पूजनाचा एक व्हिडीओ शेअर करत त्याच्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. एरवी शूटिंगमध्ये व्यस्त असलेला अक्षय दिवाळीत घरी राहून आपल्या जवळच्या माणसांबरोबर दिवाळी साजरी करताना दिसतोय.

आणखी वाचा : उर्वशी रौतेला परतली मायदेशी; फोटो पोस्ट करत म्हणाली, “माझं हृदय तुटतंय कारण…”

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
punha kartvya aahe
Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”

अक्षयने आज त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो मोठ्या उत्साहाने दिवाळी साजरी करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये अक्षयच्या ऑफिसमध्ये त्याचे कुटुंबीय आणि त्याचा संपूर्ण स्टाफ जमलेला दिसत असून त्यांच्याबरोबर अक्षय देवांची आरती करताना दिसतोय. यावेळी अक्षयने लाल रंगाचा कुर्ता आणि पायजमा परिधान केलेला आहे.

हा व्हिडिओ शेअर करत अक्षयने सर्व चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अक्षयने कॅप्शनमध्ये लिहिले, “प्रकाश, रंग आणि त्याहूनही सुंदर चेहऱ्यावरील हसू. माझा वर्षातील सर्वात खास दिवस. माझ्याकडून आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाकडून तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.”

हेही वाचा : कार्तिक आर्यनने नाकारलेल्या पान मसाल्याच्या जाहिरातीत आता अक्षय कुमार झळकणार, स्वीकारली १५ कोटींची ऑफर

दरम्यान, अक्षय कुमारचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘राम सेतु’ हा चित्रपट उद्या प्रदर्शित होणार आहे. रामायणापासून प्रेरित होऊन या चित्रपटाची कथा तयार करण्यात आली आहे. अभिनेत्री नुसरत भरुचाही चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा यांनी केले आहे.

Story img Loader