अक्षय कुमार व त्याची पत्नी ट्विंकल खन्ना सोशल मीडियावर एकमेकांबद्दलचं प्रेम व्यक्त करत असतात. एकमेकांचे वाढदिवस असो, लग्नाचा वाढदिवस असो किंवा डेट नाईट असो. हे जोडपं रोमँटिक फोटो शेअर करत एकमेकांना प्रेमाची जाणीव करू देत असतं. अक्षय व ट्विंकलच्या लग्नाला २० वर्षांहून जास्त काळ लोटला आहे. ट्विंकलशी लग्न करण्यापूर्वी अक्षयची दोन-तीन ब्रेकअप झाली होती, त्यातून कसा बाहेर पडला याबाबत त्याने स्वतः सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘रणवीर शो पॉडकास्ट’मध्ये बोलताना अक्षयने ब्रेकअपमधून बाहेर पडण्यासाठी काही टिप्स दिल्या. “माझे दोन-तीन ब्रेक झाले, त्यावेळी मी खूप जास्त व्यायाम करायचो. कारण माझ्या मनात खूप राग होता. ब्रेकअपनंतर तुम्हाला काय करायचंय हे ठरवावं लागेल. मी खूप व्यायाम करण्यावर भर दिला. मी खूप खायचो आणि व्यायाम करायचो. मला वाटतं कदाचित मार्शल आर्टिस्टकडे ब्रेक-अपला सामोरे जाण्याचा हाच एक मार्ग आहे. याच माध्यमातून आपण हार्टब्रेक काय असतो ते समजू शकतो, असा माझा विश्वास आहे,” असं अक्षय कुमार म्हणाला.

“ते आधीच विवाहित होते,” लग्न गुपित ठेवण्याबद्दल अरुणा इराणींचा खुलासा; मूल होऊ न देण्याबाबत म्हणाल्या, “तो निर्णय…”

ट्विंकल खन्नाशी लग्न करण्याआधी अक्षय रवीना टंडन, शिल्पा शेट्टी आणि पूजा बत्रा या अभिनेत्रींसोबत रिलेशनशिपमध्ये होता. रवीनाशी तर त्याचा साखरपुडाही झाला होता, पण त्यांचं नातं टिकलं नाही. नंतर अक्षयने ट्विंकलशी लग्न केलं होतं. ट्विंकल व अक्षय यांना आरव व नितारा ही दोन मुलं आहेत. त्यांची मुलंही आता मोठी झाली आहेत.

प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”

अक्षय कुमारच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास त्याचा ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चित्रपट १० एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात टायगर श्रॉफही मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय तो ‘वेलकम टू द जंगल’, ‘सिंघम अगेन’, ‘सरफिरा’ आणि ‘हेरा फेरी ३’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshay kumar shared how he moved on from breakups before marrying twinkle khanna hrc