यावर्षीपासूनच अक्षय कुमारच्या फिल्मी करीअरला जणू ग्रहणच लागलं आहे. अक्षयचे बरेच चित्रपट लागोपाठ फ्लॉप ठरले आहेत. नुकताच त्याचा आणि इम्रान हाश्मीचा ‘सेल्फी’ हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. अक्षय सध्या त्याच्या पुढील चित्रपटांवर लक्षकेंद्रित करत आहे. अभिनय आणि अॅक्शनबरोबरच अक्षय कुमार त्याच्या हटके फॅशनसाठीसुद्धा लोकप्रिय आहे.
नुकतंच अक्षय कुमार विमानतळाबाहेर मीडियासमोर आला तेव्हा त्याच्या कूल फॅशनची आणि त्याहीपेक्षा जास्त त्याच्या खांद्यावर असलेल्या बॅगेची चर्चा होत आहे. अक्षय विमानतळाबाहेर पडला तेव्हा त्याच्या खांद्यावर एका बॉक्ससारखी दिसणारी काळी बॅकपॅक कॅमेऱ्यात कैद झाली. अक्षयच्या या अतरंगी बॅगची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.
आणखी वाचा : अक्षय कुमारच्या ‘आवारा पागल दिवाना २’मध्ये या दोन स्टार्सची एंट्री; लवकरच होणार चित्रीकरणाला सुरुवात
अक्षय कुमारच्या या बॅगेची किंमत ऐकून तर तुम्ही चकितच व्हाल. अक्षय कुमारच्या या खांद्यावरील बॅकपॅकला ‘ड्रॅगन आय एलइडी बॅग’ म्हंटलं जातं. ही एक अत्यंत फंकी बॅग आहे. अक्षय कुमारबरोबर ही बॅग दिसल्यावर याबद्दल चर्चा होऊ लागली. अशातच या बॅगेच्या किंमतीबद्दल लोक बोलू लागले. तुम्हाला वाचून आश्चर्य होईल की अक्षयच्या या ‘ड्रॅगन आय एलइडी बॅग’च्या किंमतीची रेंज ९००० ते ३५००० रुपये इतकी आहे.
गेल्यावर्षी लागोपाठ चित्रपट फ्लॉप ठरल्याने अक्षयच्या आगामी चित्रपटांकडून लोकांना भरपूर अपेक्षा आहेत. अक्षय कुमार आता ‘हेरा फेरी ३’मधून प्रेक्षकांसमोर येणार आहे. बऱ्याच दिवसांनी अक्षय कुमारला विनोदी भूमिकेत पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत.