अक्षय कुमारचा चित्रपट ‘ओह माय गॉड २’ ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे, परंतु गेल्या काही काळापासून हा चित्रपट सेन्सॉर बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनच्या निर्णयामुळे चर्चेत होता.. सीबीएफसीला खरोखरच चित्रपटाचे सखोल विश्लेषण करायचे होते आणि तो कसा प्रदर्शित करायचा हे ठरवायचे होते, खासकरून ‘आदिपुरुष’नंतर घडलेल्या प्रकारामुळे यावेळी सेन्सॉर बोर्ड अधिक दक्षता घेत आहे.

या चित्रपटाला ‘ए’ सर्टिफिकेट देण्यात आले असून चित्रपटात २७ बदल सुचवण्यात आले आहेत. भारतात हा चित्रपट १८ वर्षाखालील मुलांना पाहता येणार नसला तरी या चित्रपटाला UAE मध्ये 12+ (12A) प्रमाणपत्र मिळाले आहे. ‘इटाईम्स’च्या वृत्तानुसार UAE मध्ये दिलेला एकमेव कट म्हणजे नग्नता असलेला सीन जो भारतीय सेन्सॉर बोर्डाने हटवण्यास सांगितलं आहे.

The AI dharma Story 25 October in cinemas
‘दि ए आय धर्मा स्टोरी’चे २५ ऑक्टोबरला प्रदर्शन
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
Nalasopara, girl was raped Nalasopara,
वसई : नालासोपार्‍यात १३ वर्षीय मुलीवर बलात्कार, अश्लील छायाचित्राआधारे उकळली २५ हजारांची खंडणी
Emergency, Kangana Ranaut, Censor Board,
‘इमर्जन्सी’ चित्रपटातील दृश्यांना कात्री लावण्यास सहनिर्माती कंगना राणावत तयार, सेन्सॉर मंडळाची उच्च न्यायालयात माहिती
Ankhi ek Mohenjo Daro Documentary Review
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : दृश्यसंस्कृती प्रसाराचा प्रवास…
vivek agnihotri instagram
मॅनेजर उद्धट वागल्याने मुख्य अभिनेत्याला चित्रपटातून काढलं, विवेक अग्निहोत्रींचा खुलासा; म्हणाले, “स्टार किडच्या…”
devara public review
Devara Public Review: प्रेक्षकांना कसा वाटला ‘देवरा: पार्ट १’चित्रपट? प्रतिक्रिया देत म्हणाले, “दिग्दर्शन खूपच….”
Tejaswini Pandit film Yek Number will be screened on october 10
तेजस्विनी पंडितच्या ‘येक नंबर’ चित्रपटाचे १० ऑक्टोबरला प्रदर्शन

आणखी वाचा : रजनीकांत यांच्या ‘जेलर’साठी दक्षिणेतील शहरांत जाहीर केली सुट्टी; कर्मचाऱ्यांना मोफत तिकीटांचे वाटप

UAE मध्ये मात्र १२ वर्षांपेक्षा मोठी मुलंसुद्धा हा चित्रपट पाहू शकणार आहेत यामुळे याची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. या चित्रपटाची कथा ‘हस्तमैथुन’ याच्याशी संबंधीत असल्याची चर्चा होत आहे आणि यामुळेच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आधी हा चित्रपट समलैंगिकतेवर भाष्य करणार असल्याचीही चर्चा होती, पण निर्मात्यांनी ती गोष्ट खोडून काढली आहे.

‘ओह माय गॉड २’च्या ट्रेलरलाही लोकांनी पसंती दर्शवली आहे. अक्षय कुमारच्या चित्रपटासाठी प्रेक्षक खूप दिवसांनी उत्सुक आहेत. शिवाय यातील अक्षयचा लूकही प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे. या चित्रपटात अक्षय कुमारबरोबर पंकज त्रिपाठी, गोविंद नामदेव, यामी गौतम हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ११ ऑगस्टला ‘गदर २’बरोबरच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.