बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारच्या ‘ओह माय गॉड २’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाबाबत अक्षयच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. अलीकडेच या चित्रपटाचा टीझर आणि पहिलं गाणं प्रदर्शित झालं होतं; ज्याला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. आज या चित्रपटातील ‘हर हर महादेव’ हे दुसरं गाणं प्रदर्शित झालं आहे. पण ‘ओह माय गॉड २’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख हुकणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. यामागचं कारण काय आहे, जाणून घ्या.

दरम्यान, अक्षय कुमारच्या बहुचर्चित ‘ओह माय गॉड २’ या चित्रपटाला सेंसर बोर्डकडून ए सर्टिफिकेट दिलं गेलं आहे. याचा अर्थ असा की, हा चित्रपट फक्त १८ वर्षांवरील प्रेक्षक पाहू शकतात. याच कारणामुळे अक्षयच्या या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली जाईल, असं समोर आलं आहे. ‘ई-टाईम्स’च्या वृत्तानुसार, या चित्रपटाला मिळालेले ए सर्टिफिकेट व आक्षेपार्ह दृश्य काढून टाकण्याचा सेन्सॉर बोर्डच्या सूचनेमुळे निर्माते नाराज झाले आहेत. या चित्रपटातून शिकण्यासारखी जी गोष्ट आहे आणि सेक्स शिक्षण हे प्रत्येक वयोगटातील लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. त्यामुळे चित्रपटाला यू सर्टिफिकेट दिलं पाहिजे, असं निर्मात्यांचं मत आहे.

हेही वाचा – Bigg Boss OTT 2: “त्यांची जोडी खूप क्यूट…” आलिया भट्टने सांगितले बिग बॉस ओटीटीच्या घरातील ‘रॉकी और रानी’

‘ई-टाईम्स’शी बोलताना निर्मात्यांनी सांगितलं की, “चित्रपटाच्या प्रदर्शनाची ११ ऑगस्ट ही तारीख पुढे ढकलली जाईल. कारण आम्ही सेन्सॉर बोर्डनं घेतलेल्या निर्णयाविरोधात लढू इच्छित आहोत. चित्रपटाची योग्य प्रसिद्धी आम्हाला करायची आहे.”

हेही वाचा – Video: “नवरा दुसऱ्या मुलींबरोबर…” अभिनेत्री ऐश्वर्या नारकरांच्या ‘त्या’ रीलवर नेटकऱ्याची कमेंट, सडेतोड उत्तर देत म्हणाल्या…

हेही वाचा – Video: अभिनेत्री तेजश्री प्रधानने चाहत्यांसाठी दिली खुशखबर, लवकरच….

जर ‘ओह माय गॉड २’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख बदलली नाही तर बॉक्स ऑफिसवर सनी देओलच्या ‘गदर २’ चित्रपटाबरोबर चांगलीच टक्कर पाहायला मिळेल.

Story img Loader