यंदाचं वर्षं बॉलिवूडसाठी तितकं खास नव्हतं हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. एकापाठोपाठ एक असे कित्येक चित्रपट दणकून आपटले. सणांच्या दिवशी बॉलिवूडचे चित्रपट तूफान चालतात. दिवाळी, ईद, न्यू इअर या दिवशी बरेचसे चित्रपट सुपरहीट ठरतात हा बॉलिवूडचा फार जुना मापदंड आहे. यावर्षीसुद्धा दिवाळीच्या मुहूर्तावर २ सुपरस्टार आमने सामने येणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२५ ऑक्टोबरला अक्षय कुमारचा ‘राम सेतु’ आणि अजय देवगणचा ‘थॅंक गॉड’ हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. दोन्ही चित्रपट थोडेफार वादाच्या भोवऱ्यात अडकले होते, पण अखेर काही बदल करून हे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. या चित्रपटांसाठी प्रेक्षक तसे उत्सुक आहेत, पण एकूणच बॉलिवूड चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर मिळणारा थंड प्रतिसाद बघता या चित्रपटांकडून कुणीच जास्त अपेक्षा ठेवलेली नाही. दोन्ही चित्रपटांचं ॲडव्हान्स बुकिंगसुद्धा लवकरच सुरू करण्यात आलं होतं. पण दोन्ही चित्रपटांना मिळणारा हा प्रतिसाद तसा थंडच आहे.

आणखी वाचा : कीर्ती कुल्हारी काही काळ घेणार ओटीटीमधून ब्रेक; ‘हे’ कारण देत अभिनेत्रीने केला खुलासा

ॲडव्हान्स बुकिंगमध्ये अक्षय कुमार अजय देवगणपेक्षा पुढे असला तरी एवढं भरघोस बुकिंग झालेलं नाही. उलट अक्षयच्या आधीच्या चित्रपटांच्या तुलनेत ‘राम सेतु’चं बुकिंग सर्वात कमी झालं आहे. ‘बॉलिवूड हंगामा’च्या अहवालानुसार ‘राम सेतु’ची फक्त ३९००० तिकिटेच विकली गेली आहेत. अक्षयच्या पृथ्वीराजपेक्षाही या चित्रपटाची कमी तिकिटे विकली गेली असल्याचं स्पष्ट झालं आहे. शिवाय ‘शमशेरा’, ‘विक्रम वेधा’ या चित्रपटांच्या तुळनेतही ‘राम सेतु’ला अगदीच थंड प्रतिसाद मिळाला आहे.

दिवाळी असून आणि अक्षय कुमारसारख्या कलाकाराचा चित्रपट असूनही बुकिंग न होणं ही तशी चिंतेची बाब आहे. आत्तापर्यंत जेवढी तिकिटे विकली गेली आहेत त्या आकड्यानुसार ‘राम सेतु’ पहिल्या जीवशी जेमतेम ५ ते ८ कोटी इतकीच कमाई करेल असं ट्रेड एक्स्पर्टचं म्हणणं आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर होणारी तिकीटविक्री जोवर वाढत नाही तोवर ही परिस्थिती सुधारणार नाही असं तज्ञांचं मत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshay kumar starrer ram setu records lower advance booking than recent bollywood movies avn