अक्षय कुमार, परेश रावल, सुनील शेट्टी या त्रिकुटाचा २००० साली ‘हेराफेरी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचा चाहता वर्ग मोठा आहे. आता या चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरवात झाली असून सध्या चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काही महिन्यांपासून ‘हेरा फेरी’ चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची जोरदार चर्चा सुरू आहे. गेले अनेक महिने या चित्रपटावर निर्माते व दिग्दर्शक काम करत होते. आता अखेर चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरवात झाली असून या त्रिकुटांचा फोटो व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये परेश रावल बाबुभाईच्या गेटअपमध्ये तर अक्षय कुमार राजुच्या गेटमध्ये दिसत आहे. सुनील शेट्टी मात्र साध्याच कपड्यांमध्ये दिसत आहे.

Rajdutta
६० वर्षांपूर्वी ‘इतक्या’ रुपयांत बनायचे चित्रपट; ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचा खुलासा, म्हणाले…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
shraddha kapoor andrew garfield
बॉलीवूडची ‘स्त्री’ अन् ‘स्पायडरमॅन’ जेव्हा एकत्र येतात, श्रद्धा कपूर आणि अँड्र्यू गारफिल्डचे फोटो पाहून चाहते म्हणाले…
upendra limaye first telugu film director praises him
उपेंद्र लिमयेंचा पहिला तेलुगू चित्रपट! थेट दाक्षिणात्य दिग्दर्शकाकडून कौतुक; म्हणाला, “सर कोणतीही भूमिका…”
Deepika Padukone returns to mumbai with Baby Dua
Video: दीपिका पादुकोण तीन महिन्यांच्या लेकीला घेऊन परतली मुंबईत, दुआचा पहिला व्हिडीओ पाहिलात का?
Maharashtrachi Hasyajatra fame prasad khandekar Namrata sambherao shivali parab onkar raut new drama thet tumchya gharatun coming soon
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांचं नवं नाटक लवकरच रंगभूमीवर; नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकरसह दिसतील ‘हे’ कलाकार

“सामान्य महिला असो किंवा…” आलिया भट्टच्याबाबतीत घडलेल्या ‘त्या’ प्रकारावर सेलिब्रेटी संतप्त

सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल होताच नेटकऱ्यांनी कमेंट्स करण्यास सुरवात केली आहे. एकाने लिहले आहे, “अखेर हे त्रिकुट एकत्र आले,” दुसऱ्याने लिहले आहे “बॉलिवुडच्या इतिहासातील ही सर्वोत्तम कॉमेडी असेल” अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे. तिसऱ्याने लिहले आहे “एवढ्या वर्षांनी बाबुराव, श्याम आणि राजू परत आले आहेत. मी खूप आनंदी आहे”. एकूणच चाहते त्यांचे अभिनंदन करत आहेत.

फिरोज नाडियाडवाला यांच्या मुंबईतील एम्पायर स्टुडिओमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा श्री गणेशा करण्यात आला. मूळ ‘हेरा फेरी’ हा चित्रपट २००० मध्ये प्रदर्शित झाला होता. २००६ मध्ये या फ्रेन्चायझीचा दुसरा चित्रपट ‘हेरा फेरी २’ प्रदर्शित झाला. आता प्रेक्षक ‘हेरा फेरी ३’ची आतुरतेने वाट बघत आहेत.

Story img Loader