सरदार जसवंतसिंग गिल यांच्या जीवनावर आधारित ‘मिशन रानीगंज’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. ६ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमात अभिनेता अक्षय कुमारची मुख्य भूमिका होती. तसेच परिणीती चोप्रा जसवंतसिंग गिल यांच्या पत्नीच्या भूमिकेत झळकली. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून फार चांगला प्रतिसाद मिळाला नाही.
अक्षय कुमारने पान मसाल्याच्या जाहिरातीवर दिलं स्पष्टीकरण, म्हणाला, “अशा उत्पादनांचं जाहीरपणे…”
‘सॅकनिल्क’च्या रिपोर्टनुसार, ‘मिशन रानीगंज’ चित्रपटाने चार दिवसात १४.१ कोटी रुपयांची कमाई केली. पहिल्या दिवशी २.८ कोटी, दुसऱ्या दिवशी ४.८ कोटी, तिसऱ्या दिवशी ५ कोटी आणि चौथ्या दिवशी चित्रपटाने १.५ कोटी रुपयांची कमाई केली. चित्रपटाची कमाई पाहता ती खूपच कमी आहे. चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर अक्षय कुमारने त्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
“कोणाच्या बापाची हिंमत नाही की…”, अक्षय कुमार स्पष्टच बोलला; म्हणाला, “सगळे मला…”
‘टाईम्स नाऊ नवभारत’ला दिलेल्या मुलाखतीत अक्षय कुमार म्हणाला, “व्यावसायिक चित्रपटाने जेवढी कमाई करायला हवी होती तेवढी कमाई या चित्रपटाने केलेली नाही. पण चित्रपट चांगला चालत नाहीये हे माहीत असूनही मी इथे आलो आहे. पण मी इथे त्याची जबाबदारी घेण्यासाठी आलो आहे. खरं तर आतापर्यंत मी १५० चित्रपट केले आहेत आणि हा माझा सर्वोत्तम चित्रपट आहे. हा चित्रपट चालला नाही म्हणून मी इथेआलो आहे.”
अक्षय पुढे म्हणाला, “कधी तुम्हाला यश मिळते, तर कधी नाही. कधी चित्रपट चालतात, कधी चालत नाहीत. मी ‘सिंग इज किंग’, ‘राउडी राठौर’ सारखे चित्रपट करू शकतो आणि चांगली कमाई करू शकतो. पण हा चित्रपट मी केला. मी व्यावसायिक चित्रपट करणार नाही असं म्हणत नाही. ‘वेलकम ३’ मी करतोय. तो व्यावसायिक आहे आणि हा वेगळा आहे. ही खरी कहाणी आहे. अशा अनेक घटना घडल्या आहेत, ज्या लोकांना माहीत नाही. मला ही कथा वेगळी वाटली. जसवंतसिंग यांनी आपला जीव जाऊ शकतो, असं माहीत असूनही तिथे जाऊन लोकांना वाचवलं. हा चित्रपट व्यावसायिक सिनेमा नाही हे माहीत असूनही मी केला.”