अक्षय कुमार आज कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. जुहू येथे त्याचं आलिशान घर आहेच. पण मुंबईमध्ये काही ठिकाणी त्याने गुंतवणूक म्हणून जागा खरेदी केली असल्याचीही चर्चा रंगते. इतकंच नव्हे तर परदेशातही त्याची कोटींची संपत्ती आहे असं बोललं जातं. अक्षयची संपत्ती नेमकी किती आहे? याबाबात अनेक बातम्या समोर येतात. पण अक्षयकडे २६० कोटी रुपयांचं प्रायव्हेट जेट असल्याची काही दिवसांपासून चर्चा रंगत आहे. या चर्चांनाच ट्विटरद्वारे अक्षयने उत्तर दिलं आहे.

काय म्हणाला अक्षय कुमार?
अक्षय प्रत्येक प्रश्नांना अगदी सडेतोड उत्तर देताना दिसतो. याबाबत त्याचे अनेक व्हायरल व्हिडीओही तुम्ही पाहिले असतील. आता तर स्वतःबाबातच चुकीचं वृत्त वाचल्यानंतर अक्षय कुमारला राग अनावर झाला आहे. त्याने सोशल मीडियाद्वारे अक्षय २६० कोटी रुपयांचं प्रायव्हेट जेट वापरत असल्याच्या वृत्ताला उत्तर दिलं आहे.

अक्षय कुमार का भडकला?
तो म्हणाला, “लायर लायर पँट ऑन फायर. हे वाक्य बालपणी तुम्ही ऐकलं असेल…पण खरंच काही लोक अजूनही मोठे झालेले नाहीत. मी अशा लोकांना उत्तर न देता त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याच्या मूडमध्ये नाही. माझ्याबाबत काहीही लिहिलं जाईल तेव्हा मी उत्तर देणारच.” असं म्हणत अक्षयने आपला राग व्यक्त केला.

आणखी वाचा – घरी बोलावलं, सेक्सबाबत प्रश्न विचारला अन्…; प्रसिद्ध अभिनेत्रीचे साजिद खानवर गंभीर आरोप

त्याचबरोबरीने अक्षयने त्याच्याकडे २६० कोटी रुपयांचं प्रायव्हेट जेट असल्याचं वृत्तही शेअर केलं आहे. आपल्याबाबत सुरु असलेली खोटी चर्चा अक्षयच्या पसंतीस पडली नाही. म्हणूनच त्याच्याकडे कोणत्याच प्रकारचं कोट्यावधी रुपयांचं प्रायव्हेट जेट नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

Story img Loader