अक्षय कुमार लवकरच ‘बडे मियां छोटे मियां’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात अक्षयने करिअरमध्ये सलग १६ फ्लॉप चित्रपट केले, त्याबाबत भाष्य केलं. तसेच त्याच्या अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘सेल्फी’, ‘मिशन राणीगंज: द ग्रेट भारत रेस्क्यू’ सारख्या चित्रपटांना प्रेक्षकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही, यावरही प्रतिक्रिया दिली आहे.
अलीकडेच प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या बॉक्स ऑफिसवरील खराब कामगिरीबद्दल अक्षय म्हणाला, “आम्ही सर्व प्रकारच्या चित्रपटासाठी प्रयत्न करत असतो. मी एकाच शैलीला चिकटून राहत नाही. मी सारखा विविध शैलीच्या चित्रपटांमध्ये काम करत असतो, मग तिथे यश किंवा येवो किंवा अपयश. मी करिअरच्या सुरुवातीपासून असंच काम केलंय आणि कोणत्याही गोष्टीने मला आजवर रोखलं नाही. सामाजिक विषय असतील, चांगलं काहीतरी असेल, विनोदी असेल किंवा अॅक्शन असेल, मी ते करतच राहीन.”
लग्नाला १३ वर्षे होऊनही बाळ नाही, प्रिया बापट म्हणाली, “ज्यांना मुलं नकोयत…”
“मी नेहमी वेगवेगळ्या प्रकारची कामं करत राहीन. मी एकाच गोष्टीला चिकटून राहणार नाही कारण लोक म्हणतात, ‘सर, आजकाल कॉमेडी व ॲक्शन चित्रपट जास्त चालत आहेत.’ पण याचा अर्थ मी फक्त तसेच चित्रपट करावे असं नाही. मी एकाच विषयांवरचे चित्रपट करत राहिलो की मला कंटाळा येतोय, त्यामुळे मी नवनवीन विषयांवर काम करतो. मग ते ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ असो, ‘एअरलिफ्ट’ असो किंवा ‘रुस्तम’ असो किंवा मी केलेले इतर अनेक चित्रपट असोत. कधी कधी प्रयत्नांना यश मिळतं, कधी मिळत नाही”, असं अक्षय म्हणाला.
चित्रपट एकपाठोपाठ फ्लॉप झाल्यावर तो परिस्थिताचा कसा सामना करतो याबाबत अक्षय म्हणाला, “मी हा टप्पा याआधी पाहिला नाही, असं नाही. एक वेळ अशी होती की माझ्या करिअरमध्ये एकाच वेळी सलग १६ सिनेमे फ्लॉप झाले होते. पण मी ठाम उभा राहिलो आणि काम करत राहिलो आणि आताही करेन. या चित्रपटासाठी आम्ही सर्वांनी खूप मेहनत घेतली आहे आणि आता लवकरच तो कसा आहे हे कळेल. आम्हाला आशा आहे की हा चित्रपट आमच्यासाठी गुडलक घेऊन येईल.”