२०२२ मध्ये अक्षय कुमारचे पाच चित्रपट प्रदर्शित झाले. यातील चार चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले. अक्षय चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये हस्तक्षेप करुन ते लवकर संपवतो अशा प्रकारचे आरोप त्याच्यावर करण्यात आले. त्यातच त्याने ‘हेरा फेरी’ फ्रेन्चायझीच्या पुढच्या भागामध्ये काम करण्यास नकार दिला. या निर्णयावर त्याच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या एकूण प्रकरणामुळे तो सध्या खूप चर्चेत आहे.

बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी अक्षय कुमारने वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करण्याचा अनुभव घेतला. कामानिमित्त तो कॅनडाला गेला होता. काही वर्षांपूर्वी त्याने स्वत:साठी कॅनेडियन पासपोर्ट बनवून घेतला होता. त्याला कॅनेडियन नागरिकत्वावरुन ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये त्याने या मुद्द्यावर भाष्य केले. हिंदुस्तान टाईम्स आयोजित कार्यक्रमामध्ये तो म्हणाला, “२०१९ मध्ये मी माझा कॅनडियन पासपोर्ट बदलून नव्याने भारतीय पासपोर्ट बनवून घेणार आहे असे म्हटले होते. तेव्हा मी यासाठी अर्जसुद्धा केला होता. मग करोना महामारीचं संकट आपल्यासमोर आलं. त्यात २-२.५ वर्ष वाया गेली आणि माझं काम रखडलं.”

आणखी वाचा – ‘कांतारा’स्टार रिषभ शेट्टीच्या पत्नीच्या खांद्यावर होती ‘ही’ जबाबदारी म्हणाली “गरोदर असतानाही चित्रपटासाठी…”

तो पुढे म्हणाला, “आता ती प्रक्रिया सुरु झाली आहे असं पत्र मला मिळालं आहे. मी काय करु, माझ्यामुळे करोनाचं संकट थोडी आलं होतं. कॅनडाचा पासपोर्ट असल्यामुळे माझ्या मनामध्ये आपल्या भारत देशाबद्दल आदर नाही असं ठरत नाही. मी सच्चा भारतीय आहे. नऊ वर्षांपूर्वी मला कॅनेडियन पासपोर्ट मिळाला होता.” या कार्यक्रमामध्ये बोलताना त्याने विनाकारण होणाऱ्या टीकेबद्दल खंत व्यक्त केली.

आणखी वाचा – “१०६ वर्षांची पेशवाई फक्त…”; शरद पोंक्षेंचं बाजीराव पेशवेंबद्दलचं वक्तव्य चर्चेत

त्याने एका कार्यक्रमामध्ये कॅनेडियन पासपोर्ट मागील कारण स्पष्ट केले होते. तेव्हा अक्षयच्या मागे चित्रपट फ्लॉप होण्याचे चक्र सुरु होते. त्याचे सलग १४-१५ चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले होते. यामुळे निराश होऊन चित्रपटसृष्टीचा निरोप घेऊन कॅनडामध्ये मिळेल ते काम करण्याचा निर्धार त्याने केला होता.

Story img Loader