बॉलीवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा आगामी चित्रपट ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. दोन्ही स्टार्स वेगवेगळ्या शहरांत जाऊन या चित्रपटाचे दणक्यात प्रमोशन करताना दिसतायत. अनेकदा माध्यमांसमोर येताना आपण अक्षय आणि टायगरला वेगवेगळ्या रूपांत पाहिलंच असेल; पण आज दोघंही माध्यमांसमोर येताना आपला चेहरा लपवत आले होते. या दोघांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बडे मियाँ अक्षय कुमार आणि छोटे मियाँ टायगर श्रॉफचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात अक्षय आणि टायगरने पापाराझींसमोर येताच आपला चेहरा झाकला आणि लपत लपत ते माध्यमांसमोर आले. अक्षय आणि टायगरच्या अशा वागण्यामुळे सगळेच गोंधळात पडले. अशातच एकानं विचारलं, “नक्की काय झालं सर?” तेवढ्यात दुसरा पापाराझी म्हणाला, “हा नक्कीच ट्रेंड आहे.” त्यानंतर हसत हसत अक्षय आणि टायगरनं एकमेकांना मिठी मारली. अशा प्रकारे दोघांनी पापाराझींबरोबर प्रॅंक केला, असं लक्षात आलं.

व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत, “खिलाडीशिवाय अशी मस्करी कोणीच करू शकत नाही.” अशी कमेंट एकानं केली. तर, काही जण म्हणाले, “चेहरा लपवावा लागेल, असं कामच का करायचं?”

हेही वाचा… हिरवा चुडा, मेहेंदीने रंगलेले हात… पूजा सावंतने शेअर केले हनिमूनचे फोटो; म्हणाली, “अजूनही…”

दरम्यान, अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ अभिनीत ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चित्रपट १२ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या अॅक्शन थ्रिलर चित्रपटात अक्षय आणि टायगरबरोबरच पृथ्वीराज सुकुमारन, सोनाक्षी सिन्हा, मानुषी छिल्लर, अलाया फर्निचरवाला, रोनित रॉय यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshay kumar tiger shroff hide their face in front of media did prank with paparazzi dvr