बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचे एका मागोमाग एक चित्रपट फ्लॉप ठरत आहेत. ‘रक्षाबंधन’, ‘पृथ्वीराज चव्हाण’, ‘बच्चन पांडे’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरल्यानंतर गेल्याच महिन्यात प्रदर्शित झालेला अक्षय कुमारचा ‘सेल्फी’ही सपशेल फेल ठरला. या चित्रपटालाही बॉक्स ऑफिसवर फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. आता अक्षय नवीन चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

अक्षयने त्याच्या सोशल मीडियावरुन नव्या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. Soorarai Pottru या तामिळ चित्रपटाचा हा हिंदी रिमेक असणार आहे. अक्षय कुमारच्या या नव्या चित्रपटाचं नाव गुलदस्त्यात असून १ सप्टेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमारने नव्या चित्रपटाचं पोस्टर शेअर करताच नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं आहे.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Theatre canteen owner bites man's ear over food bill during 'Pushpa 2' screening.
Pushpa 2 : चित्रपटगृहाच्या कॅन्टीन मालकाने घेतला पुष्पा २ पाहायला आलेल्या प्रेक्षकाच्या कानाचा चावा, मध्यांतरावेळी नेमकं काय घडलं?
Rajdutta
६० वर्षांपूर्वी ‘इतक्या’ रुपयांत बनायचे चित्रपट; ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचा खुलासा, म्हणाले…
Lalu Prasad Yadav Controversial comment
Lalu Prasad Yadav Video : “नयन सेंकने….”; नितीश कुमार यांच्या महिला संवाद यात्रेबद्दल लालू प्रसाद यादव यांचं आक्षेपार्ह वक्तव्य
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
Rahul Gandhi Narendra Modi Gautam Adani (2)
VIDEO : संसदेच्या आवारात राहुल गांधींनी घेतली ‘मोदी-अदाणीं’ची मुलाखत? विरोधी खासदारांनीच घातले मुखवटे

हेही वाचा>> ४७व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईने दिला बाळाला जन्म, २३व्या वर्षी ताई झाल्यानंतर फोटो शेअर करत म्हणाली…

अक्षयच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. “रिमेक बंद करा” अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्याने “एक दोन वर्ष वेळ देऊन एखादा चांगला चित्रपट बनव. तुला पाहून लोकांना आता कंटाळा आला आहे”, असं म्हटलं आहे. “अजून एक रिमेक. तू फक्त रिमेक का करतोस? आम्हाला तुला चांगल्या आणि फ्रेश स्टोरी असलेल्या चित्रपटात पाहायचं आहे”, असंही एकाने म्हटलं आहे. तर एका नेटकऱ्याने “रिमेकचा किंग परतला आहे” असं म्हणत हसण्याचे इमोजी पोस्ट केले आहेत. “१०-२० वर्ष ब्रेक घे” अशी कमेंटही केली आहे.

हेही वाचा>> सतीश कौशिक यांची हत्या झाली म्हणणाऱ्यांना अनुपम खेर यांचं सडेतोड उत्तर, म्हणाले “तो आयुष्यभर…”

अक्षय कुमार आगामी ‘बडे मिया छोटे मिया’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. याबरोबरच तो ‘ओह माय गॉड २’ आणि ‘हेरा फेरी ३’ या चित्रपटांतही झळकणार आहे.

Story img Loader