अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफचा आगामी चित्रपट ‘बडे मियां छोटे मियां’चा मेकअप आर्टिस्ट श्रवण विश्वकर्मावर एका बिबट्याने हल्ला केला. २७ वर्षीय श्रवण त्याच्या बाइकवर होता आणि मित्राला चित्रपटाच्या सेटवर सोडण्यासाठी जात होता. त्याचवेळी त्याच्या बाइकची बिबट्याशी टक्कर झाली आणि श्रवण बेशुद्ध झाला. त्यानंतर त्याला काही लोकांनी रुग्णालयात दाखल केलं. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेकअप आर्टिस्ट श्रवण विश्वकर्मा सध्या रुग्णालयात असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार या घटनेबद्दल बोलताना श्रवणने सांगितलं की, “मी मित्राला सेटवर सोडण्यासाठी जात होतो. शूट लोकेशन पोहोचण्याच्या थोडं अगोदर ही घटना घडली. एक डुक्कर रस्त्यावर पळत होतं. मी बाइकचा स्पीड वाढवला तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्या डुक्कराच्या मागे एक बिबट्या आहे.”

आणखी वाचा- ‘मिर्झापूर’ फेम अभिनेते शाहनवाज प्रधान यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

श्रवण पुढे म्हणाला, “माझ्या बाइकची टक्कर बिबट्याशी झाली. त्यानंतर मला फक्त एवढंच आठवतंय की मी बाइकवरून खाली पडलो आणि तो बिबट्या माझ्या आसपास फिरत होता. त्यानंतर काय झालं हे मला आठवत नाही. मी बेशुद्ध झालो होतो. कदाचित काही लोकांनी मला पाहिलं आणि त्यानंतर डॉक्टरकडे आणलं.” या घटनेनंतर ऑल इंडिया सिनेवर्कर्सचे अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता यांनी सरकारला यात गांभीर्याने लक्ष घालण्याचा आग्रह केला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshay kumar upcoming film bade miyan chote miyan makeup artist attacked by leopard mrj