बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार हा कायमच विविध कारणांनी चर्चेत असतो. बॉलीवूडमधील आघाडीचा कलाकार म्हणून त्याला ओळखले जाते. आज अक्षय कुमार त्याचा ५६ वा वाढदिवस साजरा करत आहे. यंदाचा वाढदिवस मात्र अक्षयने वेगळ्या पद्धतीने साजरा करायचं असं ठरवलं आहे.

अक्षयने शनिवारी महाकाल मंदिरात हजेरी लावली. आपल्या वाढदिवसानिमित्त बाबा महाकालचे दर्शन घेण्यासाठी अभिनेता आपल्या कुटुंबासह येथे पोहोचला होता. यावेळी त्याच्याबरोबर भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू शिखर धवनही महाकाल मंदिरात दिसला. या दोघांना पाहून तिथे उपस्थित असलेले भाविक खुश झाले.

आणखी वाचा : विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द व्हॅक्सिन वॉर’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; पोस्टर शेअर करत पल्लवी जोशीने लिहिलं…

सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. जगप्रसिद्ध श्री महाकाल मंदिराचे पुजारी आशिष गुरू यांनी सांगितले की, चित्रपट अभिनेता अक्षय कुमार त्याच्या कुटुंबासह बाबा महाकालचे दर्शन घेण्यासाठी त्याच्या वाढदिवसानिमित्त भस्म आरतीला हजर होता, मंदिरातील नंदी हॉलमधून त्यांनी या दिव्य भस्म आरतीचे दर्शन घेतले.

यावेळी अक्षयबरोबर त्याचा मुलगा आरव, भाची सिमर आणि बहीण अलका हिरानंदानीही उपस्थित होते. अक्षय कुमार याआधीही अनेकदा बाबा महाकालच्या दर्शनाला आला आहे, मात्र आज त्याच्या वाढदिवसानिमित्त तो त्यांच्या भक्तीत तल्लीन झालेला दिसला. तसेच त्याने आपल्या आगामी ‘मिशन राणीगंज’ चित्रपटाच्या यशासाठीही प्रार्थना केली.

Story img Loader