Akshay Kumar : २००५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बरसात’ हा चित्रपट सुरुवातीला अक्षय कुमारला ऑफर करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर शूटिंग सुरू होण्यापूर्वी खिलाडी कुमारने या चित्रपटासाठी नकार कळवला. सामान्यत: मानधन, स्क्रिप्ट, वेळ-तारखा जुळत नसल्याने मुख्य अभिनेत्यांकडून एखाद्या सिनेमासाठी नकार दिला जातो. मात्र, या सगळ्या पलीकडे जाऊन अक्षयने सिनेमासाठी नकार देण्याचं कारण होती प्रियांका चोप्रा. दिग्दर्शक सुनील दर्शनने याबाबत ‘फ्रायडे टॉकीज’ या युट्यूब चॅनेलशी संवाद साधताना खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुनील दर्शन सांगतात, “अक्षय कुमार ( Akshay Kumar ) हा माझ्या ‘बरसात’ चित्रपटाचा सुरुवातीला हिरो होता. त्यानंतर हळुहळू प्रोजेक्टला सुरुवात झाल्यावर त्याच्या पत्नीला एक समस्या निर्माण झाली. ‘बरसात’ चित्रपटाच्या शूटिंगला अक्षय आणि प्रियांकाने सुरुवात केली…त्यावेळी दोघांची जोडी प्रचंड चर्चेत होती. या संपूर्ण चित्रपटाला एका शेड्यूलमध्ये शूट करायचं होतं आणि शेड्यूल संपायला अवघे पाच दिवस राहिलेले असताना अक्षयने मला फोन केला आणि भेटायचं आहे असं सांगितलं.”

हेही वाचा : भेटला विठ्ठल माझा…; सूरज पोहोचला केदार शिंदेंच्या घरी! ‘गुलीगत किंग’ला दिली खास भेटवस्तू, Video एकदा पाहाच

ट्विंकल खन्ना सोडून गेलेली घर

दिग्दर्शक सुनील दर्शन पुढे म्हणाले, “मी अक्षयला भेटायला जात होतो, तेव्हाच मला वाटेत बॉबी देओलच्या मॅनेजरचा फोन आला होता आणि त्याने बॉबीबरोबर एक चित्रपट बनवा अशी मागणी केली होती. मी त्या मॅनेजरला काही दिवस थांब असं कळवलं होतं आणि मी अक्षयला भेटायला गेलो. काही चुका अशा झाल्या होत्या की, प्रियांका व अक्षयच्या अफेअरच्या चर्चा पसरू लागल्या होत्या. यामुळे ट्विंकल घर सोडून गेली होती.”

हेही वाचा : Video : “दाजींना सांग चांगली गाणी…”, अंकिता अन् सूरजचं फोनवर भन्नाट संभाषण; ‘कोकण हार्टेड बॉय’ला दिला खास निरोप

“एक अभिनेता म्हणून तुम्ही जबाबदारीने वागलं पाहिजे. जर तुमची पत्नी अभिनेत्री असेल, तिला इंडस्ट्रीमधल्या सगळ्या गोष्टी माहिती असतील आणि त्यातही तिने मोठ्या स्टार्सबरोबर काम केलेलं असेल तर अशावेळी काळजी घेतली पाहिजे. मी या परिस्थितीसाठी प्रियांकाला अजिबात जबाबदार धरत नाही. तिला ( प्रियांका ) योग्य वाटत होतं ते ती करत होती.” असं दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी सांगितलं. यानंतर अक्षयने सिनेमा सोडला आणि २००५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बरसात’ चित्रपटात दिग्दर्शकाने बॉबी देओलला मुख्य भूमिकेत घेतलं होतं.

अक्षय कुमार व ट्विंकल खन्ना ( Akshay Kumar )

दरम्यान, अक्षय कुमार ( Akshay Kumar ) आणि प्रियांका चोप्रा यांनी एकत्र ‘ऐतराज’, ‘मुझसे शादी करोगी’, ‘अंदाज’, ‘वक्त’ अशा चित्रपटांमध्ये काम केलं आहे. यानंतर दोघांनी एकत्र काम केलं नाही.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshay kumar wife twinkle khanna left house after rumors of priyanka chopra affair with him reveals director sva 00