‘हेरा फेरी’ या सुपरहीट चित्रपटाच्या तिसऱ्या भागावरून सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. या सीरिजचे दोन्ही भाग आजही प्रेक्षकांचे अत्यंत आवडीचे आहेत. शिवाय या सीरिजमधील परेश रावल, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी या तिघांची जोडी ही प्रेक्षकांना फार आवडली. आता याच्या तिसऱ्या भागात अक्षय कुमार नसल्याची चर्चा रंगली आहे. नुकतंच अभिनेते परेश रावल यांनीदेखील ट्विटरच्या माध्यमातून याची पुष्टी केली आणि त्यांनंतर सोशल मीडियावर याची चर्चा होऊ लागली आहे.

या तिसऱ्या भागात अक्षय ऐवजी कार्तिक आर्यनला दिसू शकतो अशी चर्चा सध्या होत आहे आणि यामुळे अक्षय कुमारचे आणि ‘हेरा फेरी’ या चित्रपट मालिकेचे चाहते चांगलेच नाराज झाले आहेत. ‘अक्षयला परत आणा’ असा ट्रेंडसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अक्षय ऐवजी कार्तिक आर्यन या चित्रपटात दिसणार आहे हे जवळपास नक्की झालं आहे. याबाबत ‘बॉलिवूड हंगामा’च्या स्पेशल वृत्तानुसार अक्षय या चित्रपटात न दिसण्यामागचं कारण समोर आलं आहे.

Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Muramba
Video: “जोपर्यंत तू रमा…”, रमासारखी दिसणारी माही व अक्षय समोरासमोर येणार का? ‘मुरांबा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
punha kartvya aahe
Video: “तुम्ही कितीही दूर…”, वसुंधराने केला सासूचे मन जिंकण्याचा निर्धार; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत नवीन वळण, पाहा प्रोमो
tharla tar mag can arjun sayali meets again madhubhau took strict decision
ठरलं तर मग : सायली-अर्जुनचं नातं कायमचं तुटणार? मधुभाऊंनी लेकीकडून घेतलं ‘हे’ वचन, तर दारात आलेला अर्जुन…; पाहा प्रोमो
Tharla Tar Mag Serial New Track
‘ठरलं तर मग’ मालिकेत नवीन वळण! सायलीचा लूकही बदलला; मधुभाऊंनी लेकीसाठी घेतला कठोर निर्णय…; पाहा प्रोमो
Tula Shikvin Changalach Dhada promo
भुवनेश्वरीमुळे मोडणार लाडक्या लेकाचा संसार? अक्षरा-अधिपतीमध्ये टोकाचे वाद; मास्तरीणबाईंनी सांगितला ‘तो’ निर्णय, पाहा प्रोमो
marathi movie amaltash released on youtube
गायक राहुल देशपांडेंचा ‘अमलताश’ सिनेमा घरबसल्या मोफत पाहा, कुठे आहे उपलब्ध? जाणून घ्या

आणखी वाचा : “तो माझ्या प्रायव्हेट पार्टकडे एकटक…” आणखी एका मॉडेल अभिनेत्रीचा साजिद खानवर गंभीर आरोप

‘बॉलिवूड हंगामा’च्या सूत्रानुसार फिरोज नाडियाडवाला हे बरेच दिवस ‘हेरा फेरी ३’ वर विचार करत होते. याबद्दल ते कार्तिक आर्यन आणि अक्षय कुमार दोघांशी चर्चा करत होते. ‘भूलभुलैया २’च्या यशानंतर कार्तिक आर्यन हा फिरोज यांचा एक हुकमी एक्काच बनला असल्याचं चित्र समोर आलं आहे. या दोन्ही स्टार्सशी चर्चेदरम्यान अक्षय आणि कार्तिक यांनी मागितलेल्या मानधनात बरीच तफावत आल्याने कार्तिकची वर्णी लागल्याचं समोर येत आहे.

माहितीनुसार, अक्षय कुमारने चित्रपटासाठी तब्बल ९० कोटी एवढं मानधन आणि नफ्यातील काही हिस्सा मागितल्याचं समोर आलं आहे. तिथे कार्तिक आर्यन हा चित्रपट केवळ ३० कोटीमध्ये करण्यास तयार आहे. चित्रपटाचे इतर खर्च आणि मिळकत पाहता तब्बल ४५ कोटी वाचवण्याच्या दृष्टीने फिरोज यांनी कार्तिकला चित्रपटात घेण्याचं जवळपास नक्की केल्याचं सूत्रांच्या माहितीनुसार स्पष्ट झालं आहे. अजूनतरी याबद्दल कोणत्याही अभिनेत्याने अधिकृत घोषणा केली नसल्याने यामागील खरं कारण समोर आलेलं नाही. ‘हेरा फेरी ३’चं दिग्दर्शन अनिस बाजमी करणार असल्याची चर्चा आहे. अजूनही या चित्रपटाच्या कथेवर काम सुरू असल्याचंही बॉलिवूड हंगामाच्या सूत्राने स्पष्ट केलं आहे.

Story img Loader