अभिनेता अक्षय कुमार सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तो पत्नी ट्विंकल खन्ना, मुलगा आरव आणि मुलगी नितारा यांच्याबरोबरचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. याशिवाय तो कुटुंबीयांबरोबर धमाल करतानाही दिसतो. बॉलिवूडसाठी सुपरस्टार असलेला अक्षय कुमार हा सामान्यांप्रमाणे आपल्या कुटुंबाचं रक्षण करत असतो. अलीकडेच अक्षय कुमार त्याची मुलगी नितारासह स्पॉट झाला.
अक्षय कुमार मुलगी निताराबरोबर ‘अवतार २’ पाहण्यासाठी जुहू पीव्हीआरला आला होता. पण शोनंतर जेव्हा त्याला पापाराझींनी घेरले, तेव्हा तो नितारासाठी बॉडी गार्ड बनला. अक्षय कुमारच्या या वागण्याने सर्वांची मनं जिंकली. अक्षय आज पहिल्यांदाच लेक निताराबरोबर सार्वजनिक ठिकाणी दिसला. या चित्रपटाच्या बहाण्याने त्याच्या चाहत्यांनाही अक्षयची लेक नितारा कशी दिसते, याची झलक पाहायला मिळाली.
अक्षय कुमार जेव्हाही मुलगी निताराबरोबर बाहेर पडतो तेव्हा त्यांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होतात. अक्षय स्वतःही आपल्या मुलीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतो, पण त्यात तिचा चेहरा दिसत नाही. पण आजच्या या व्हिडीओत पहिल्यांदाच चाहत्यांना निताराची झलक पाहायला मिळाली. लेकीबरोबर ‘अवतार २’ चित्रपट पाहायला गेलेल्या अक्षयच्या या कूल लूकचं चाहते कौतुक करत आहेत.