जगप्रसिद्ध गायकांचे नेहमी मुंबईत लाइव्ह कॉन्सर्ट होतं असतात. या लाइव्ह कॉन्सर्टला अनेक सेलिब्रिटी उपस्थिती लावतात. नुकताच जगप्रसिद्ध गायिका दुआ लिपाचा मुंबईत लाइव्ह कॉन्सर्ट झाला. या कॉन्सर्टला सर्वसामान्यांसह सेलिब्रिटींनी खास हजेरी लावली होती. यावेळी उद्योगपती मुकेश अंबानींची धाकटी सून राधिका अंबानी, ईशा अंबानी पाहायला मिळाली. दुआ लिपाच्या लाइव्ह कॉन्सर्टमधील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

मुंबईत झालेल्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये गायिका दुआ लिपाने शाहरुख खानच्या चाहत्यांना एक जबरदस्त सरप्राइज दिलं. या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये दुआ लिपाने शाहरुखचं ‘वो लडकी जो’ गाणं आणि तिच्या गाण्याचं मॅशअप लावलं. त्यानंतर शाहरुखच्या चाहत्यांनी एकच गोंधळ घातला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे.

Arjun Kapoor Fan shouting Malaika at Mere Husband Ki Biwi promotion video viral
Video: अर्जुन कपूरला पाहताच चाहत्याने घेतलं मलायकाचं नाव, अभिनेता वैतागून…; नेमकं काय घडलं? जाणून घ्या…
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
sonu nigam
Video : “…तर तुम्ही निवडणुकीत उभे राहा”, कोलकातामधील कॉन्सर्टमध्ये सोनू निगमचा संताप अनावर; पाहा व्हिडीओ
Vicky Kaushal Viral Video
Video : विकी कौशलने जिममध्ये अजय-अतुलच्या ‘या’ मराठी गाण्यावर धरला ठेका; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
vicky kaushal
Video: विकी कौशलने पाटणामध्ये घेतला लिट्टी-चोखाचा आस्वाद; व्हिडीओ शेअर करीत म्हणाला…
Priyanka Chopra adorable gesture for bhabhi video viral
Video: नणंद असावी तर अशी! भावाच्या संगीत सोहळ्यात प्रियांका चोप्राच्या ‘त्या’ कृतीचं होतंय कौतुक
Priyanka Chopra Dance Video
Video : भावाच्या हळदीत देसी गर्लने शाहरुख खानच्या गाण्यावर लगावले ठुमके; पाहा डान्सचा व्हिडीओ
Bharti Singh
Video : शाहरुख खानचं ‘ते’ कृत्य पाहून भारती सिंगला अश्रू झाले अनावर; किस्सा सांगत म्हणाली…

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या दुसऱ्या पर्वाविषयी मधुराणी प्रभुलकरचं भाष्य, म्हणाली…

दुआ लिपाच्या लाइव्ह कॉन्सर्टमधील व्हिडीओ शाहरुखची लेक सुहाना खानने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने काही इमोजी शेअर केले आहेत.

Suhana Khan Story
Suhana Khan Story

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकर लवकरच झळकणार नव्या भूमिकेत, इन्स्टाग्राम लाइव्ह सेशनमध्ये केला खुलासा; म्हणाली, “पुढचा प्रोजेक्ट…”

दरम्यान, सोशल मीडियावर नेहमी कोणतं ना कोणतं गाणं ट्रेंड होतं असतं. तसंच सोशल मीडियावरील बरेच युझर्स आहेत, जे इतर भाषांमधील गाणी आपल्या भाषेतील गाण्यांमध्ये मिक्स करून मॅशअप करत असतात. काही दिवसांपूर्वी शाहरुख आणि दुआ लिपाच्या गाण्याच्या मॅशअपचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या मॅशअपने अक्षरशः नेटकऱ्यांना वेड लावलं. त्याप्रमाणे दुआ लिपाला देखील या मॅशअपची भुरळ पडली. त्यामुळे तिने हे मॅशअप स्वतःच्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये वापरलं.

हेही वाचा – ५ वर्षांचा प्रवास अखेर थांबला! ‘आई कुठे काय करते’ मालिका संपली, मधुराणीसह सगळेच कलाकार भावुक, वाचा पोस्ट

शाहरुख खानचे चाहते जगभरात आहेत. स्वतः दुआ लिपा देखील शाहरुखची चाहती आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये दुआने हिंदी सिनेसृष्टीतला शाहरुख तिचा आवडता अभिनेता असल्याचं सांगितलं होतं. तसंच तिने शाहरुखची भेटदेखील घेतली होती. या खास भेटीचा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.

Story img Loader