‘शुरू मजबूरी में किये थे… अब मजा आ रहा है’ असा काहीसा प्रवास अभिनेता अली फजल याचा आहे. हॉलीवूड आणि बॉलीवूडचे बरेच चित्रपट केले असेल तरी एका वेब सीरिजमधील भूमिकेमुळे अली फजल तरुणाईच्या मनापर्यंत पोहोचला. ‘मिर्झापूर’मधील त्याच्या ‘गुड्डू पंडित’ या भूमिकेने अक्षरशः प्रेक्षकांना वेड करून सोडलं. त्याचे या सीरिजमधले बरेच डायलॉग खूप प्रसिद्ध झाले. अली याच्याकडे अत्यंत अभ्यासू अभिनेता म्हणून पाहिलं जात. आपण बरेच कलाकार बॉलीवूडमध्ये काम करून हॉलीवूडमध्ये गेल्याचं पाहिलं आहे. पण अलीचा हॉलीवूड ते बॉलीवूड असा प्रवास आहे. आज हाच प्रवास त्याच्या वाढदिवसानिमित्ताने जाणून घेणार आहोत.

अली फजल याचा जन्म १५ ऑक्टोबर १९८६ साली दिल्लीत झाला. त्याच बालपण काही काळच दिल्लीत गेलं. अलीचं सातवी पर्यंतचं शिक्षण लखनऊमधील ला मार्टिनियर कॉलेजमध्ये झालं. त्यानंतर उर्वरित शिक्षणासाठी अलीला बॉर्डिंग शाळेत टाकण्यात आलं. देशातील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या देहरादूनच्या द दून स्कूलमध्ये त्याचं शिक्षण झालं. अलीला वैमानिक आणि डॉक्टर होण्याची खूप इच्छा होती. तसेच त्याला खेळाची खूप आवड होती. बास्केटबॉल, हॉलीबॉल असे बरेच खेळ तो खेळत असे. त्यामुळे त्यानं आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर भारताच प्रतिनिधित्व करण्याचं स्वप्न पाहिलं होतं. पण यादरम्यान त्याचा एक अपघात झाला आणि त्याची गाडी अभिनय क्षेत्राकडे वळाली.

Kartik Aaryan Recalls His Struggle
वारंवार नकार तरी मानली नाही हार; कार्तिक आर्यनने शेअर केल्या संघर्ष काळातील आठवणी, म्हणाला, “मला लाज…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Image of Baba Abhay Singh or a related graphic
महाकुंभमेळ्यात अस्खलित इंग्रजी बोलणारे IIT Baba नेमके कोण आहेत? आयआयटी मुंबईत शिकलेले अभय सिंग आध्यात्माकडे कसे वळाले
sharad pawar slams amit shah news in marathi
देशाचे पहिले तडीपार गृहमंत्री! शरद पवारांचा अमित शहांवर प्रतिहल्ला
shikaayla gelo ek marathi drama review
नाट्यरंग : शिकायला गेलो एक! व्यंकूची ‘आज’ची शिकवणी
Shahrukh Khan And Manisha koirala
“त्याच्या फ्लॅटमध्ये चटई अंथरलेली असे अन्…”; मनीषा कोईरालाने सांगितली शाहरुख खान स्टार होण्यापूर्वीच्या दिवसांची आठवण
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”
varad chawan reveals shocking incident
सीनच्या नावाखाली थोबाडीत मारल्या, गाल सुजला अन्…; मराठी अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग; म्हणाला, “माझे बाबा…”

हेही वाचा – रेखा यांनी विनोद मेहरासाठी रचलं होतं आत्महत्येचं नाटक? काय घडलं होतं? वाचा माहित नसलेला किस्सा

एकेदिवशी खेळता-खेळता अलीचा खांदा निखळला आणि त्याचा हातच तुटला. यामुळे अलीचं एका क्षणात भारताच प्रतिनिधित्व करण्याच स्वप्न भंगलं. त्यानंतर तो काही काळ नैश्यात गेला. पण अशा काळात प्रत्येकाच्या आयुष्यात मित्र हा उपचाराप्रमाणे येतो, तसं काहीस अलीच्या आयुष्यात घडलं. त्याच्या मित्राने त्याला एक सल्ला दिला. त्यावेळेस कॅनडावरून एक कुटुंब देहरादूनला आलं होतं; जे शेक्सपियरवर आधारित नाटक करत होतं. या कुटुंबात दोन मुली होत्या, ज्या या नाटकात काम करत होत्या. याच नाटकाचं ऑडिशन देण्याचा सल्ला अलीला त्याच्या मित्राने दिला. कारण अलीचं इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व खूप चांगलं होतं. मित्राचं ऐकून अलीने त्या नाटकासाठी ऑडिशन दिलं आणि तो त्यासाठी निवडला गेला. त्याने शेक्सपियरच्या या नाटकात जोकरची भूमिका निभावली. त्यानंतर अली पुढील शिक्षणासाठी मुंबईत आला. वनरुम किचनमध्ये मित्रांबरोबर राहून त्यानं शिक्षण पूर्ण करत इंग्रजी रंगभूमीवर काम केलं.

सेंट जेवियर्स या मुंबईतील प्रसिद्ध कॉलेजमध्ये अली अर्थशास्त्र विषयात पदवीधर झाला आहे. कॉलेजमध्ये असताना दुसऱ्या वर्षात अलीची लोकप्रिय दिग्दर्शक, लेखक सईज अख्तर मिर्झा यांच्याशी भेट झाली. त्यांनी अलीला एका इंग्रजी नाटकात पाहिलं होतं. त्यामुळे त्यांनी त्याला एका चित्रपटातील मोठ्या भूमिकेसाठी घेतलं. पण दुर्दैवाने हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही. त्यानंतर कॉलेजच्या तिसऱ्या वर्षात असताना राजकुमार हिरानी यांनी अलीच इंग्रजी नाटकातलं काम पाहून ‘थ्री इडियट्स’ चित्रपटासाठी विचारलं. भूमिकेच्या लांबीचा विचार न करताना अलीने ‘थ्री इडियट्स’मधील ‘जॉय लोबो’ ही भूमिका साकारण्यासाठी होकार दिला. या चित्रपटातील अलीची भूमिका छोटी असली तरी ती चांगलीच भाव खाऊ गेली.

हेही वाचा – वडिलांच्या भीतीमुळे बँकेत नोकरी ते बॉलीवूडमध्ये पदार्पण, असा आहे सोहा अली खानचा प्रवास

त्यानंतर अलीने ‘फुकरे’, ‘खामोशिया’, ‘हॅपी भाग जायेगी’, ‘रे’, ‘सोनाली केबल’, ‘बॉबी जासूस’, ‘खुफिया’ अशा बऱ्याच हिंदी चित्रपट काम केलं. तसेच ‘फ्यूरियस ७’, ‘व्हिक्टोरिया अँड अब्दुल’, ‘डेथ ऑन द नाइल’, ‘कंधार’ यांसारख्या हॉलीवूडच्या सुपरहिट चित्रपटात तो झळकला. पण अली ‘मिर्झापूर’ या वेब सीरिजमुळे अधिकच प्रसिद्धीच्या झोतात आला. या सीरिजनंतर लोक त्याला अली नाही तर ‘गुड्डू पंडित’ म्हणून बोलवू लागले. खरंतर त्याला या वेब सीरिजमधील ‘मुन्ना त्रिपाठी’ या भूमिकेसाठी विचारलं गेलं होतं. पण ‘गुड्डू’ या भूमिकेत त्याला अधिक रस वाटल्यामुळे त्यानं ‘मुन्ना त्रिपाठी’च्या भूमिकेसाठी नकार दिला. ‘गुड्डू’ या भूमिकेसाठी अलीने खूप मेहनत घेतली. दिवसाला तीन-तीन तास तो वर्कआउट करायचा. त्याला या भूमिकेवर काम करताना झोप यायची नाही, हा सगळा अनुभव अलीने एका मुलाखतीमध्ये सांगितला होता.

अभिनयाबरोबर अली हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत असतो. रिचा चड्ढा आणि त्याची लव्हस्टोरी खूपच रंजक आहे. २०१२ साली ‘फुकरे’ या चित्रपटाच्या सेटवर दोघांची ओळख झाली. मग दोघांची चांगली मैत्री झाली आणि त्यानंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. सर्वात आधी रिचाने अलीला प्रपोज केलं ते पण एकदम रोमँटिक अंदाजात. एकेदिवशी अलीच्या घरी दोघं एकत्र चित्रपट पाहत होते. त्यावेळी रिचाने अलीला ‘आय लव्ह यू’ म्हणतं प्रपोज केलं. हे ऐकून त्याला धक्काच बसला. याचं उत्तर लगेच न देताना अलीने त्याच्यासाठी ३ महिने घेतले. जेव्हा अलीने रिचाला उत्तर दिलं तेव्हापासून दोघांच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली. बरेच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करून नव्या आयुष्याला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. गेल्यावर्षी दोघं लग्नबंधनात अडकले.

Story img Loader