अभिनेत्री आलिया भट्टने आजवर तिच्या दमदार अभिनयाने वैविध्यपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता आलिया भट्ट तिच्या ‘जिगरा’ या सिनेमात जबरदस्त अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. त्यात आलिया धमाकेदार अ‍ॅक्शन आणि स्टंट्स करताना दिसत आहे. आलिया भट्टबरोबर ‘आर्चिज’फेम अभिनेता वेदांग रैनाही या सिनेमात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. बॉलीवूडची आलिया यात एका इमारतीवरून दुसरीकडे उड्या मारत फायटिंग करीत एका वेगळ्याच अवतारात प्रेक्षकांसमोर येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘जिगरा’ सिनेमाच्या ट्रेलरच्या सुरुवातीलाच आलिया थोडी घाबरलेली दिसते. त्यात तिच्या भावाला परदेशी भूमीवर ड्रग्ज (अमली पदार्थ) जवळ सापडल्याने अटक करण्यात आली आहे, असं दाखवण्यात आलं आहे. ही बातमी समजल्यावर आलिया भट्ट भावाला भेटण्यासाठी तळमळताना दिसते. सुरुवातीला घाबरलेली आलिया भावाला वाचवण्यासाठी काय काय करते, हा प्रवास ट्रेलरमधून दिसतोय. ट्रेलरच्या मध्यावर आलियाचे जबरदस्त अ‍ॅक्शन सीन्स दिसून येतात.

हेही वाचा…‘या’ दाक्षिणात्य सुपरस्टारच्या घरात आलिया भट्ट आणि रणबीर कपूरने ठरवलं होतं होणाऱ्या बाळाचं नाव

वेदांग रैना आलिया भट्टच्या भावाच्या भूमिकेत दिसतोय. त्याला ड्रग्जच्या प्रकरणामध्ये मृत्युदंडाची शिक्षा झाली आहे. त्यामुळेच आलिया त्या प्रकरणातून त्याची तुरुंगातून सुटका व्हावी यासाठी धडपड करते. आलिया स्वतःच आपल्या भावाची सुटका करण्याचा निर्णय घेते आणि त्यासाठी ती खडतर ट्रेनिंग घेताना दाखवली आहे.

आगीच्या ज्वालांमधून एंट्री आणि हातोड्यासह जबरदस्त अ‍ॅक्शन

ट्रेलरमध्ये अनेक पोलीस आलियाच्या कारमागे लागल्याचे दिसून येते. पोलिसांना चकवा देत आलिया गाडी चालवत आगीच्या ज्वालांमधून एका इमारतीत एंट्री करते. आपल्या हाती असलेल्या हातोड्यानं ती जबरदस्त अ‍ॅक्शन करताना दिसते. इमारतींवरून उडी मारत फायटिंग करीत, भावाला वाचवण्यासाठीचे आलियाचे प्रयत्न ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले आहेत.

हेही वाचा…“…अन् आमिर खडकामागे जाऊन रडू लागला”; ट्विंकल खन्नाने सांगितला किस्सा, म्हणाली, “मी अक्षयबद्दल…”

अ‍ॅक्शनबरोबर सस्पेन्स थ्रिलर

‘जिगरा’मध्ये अ‍ॅक्शनबरोबर सस्पेन्सदेखील आहे. ट्रेलरमध्ये दोन अनोळखी चेहरे दाखविण्यात आले आहेत. हे चेहरे नेमके कोण आहेत? त्यांच्या काय भूमिका आहेत? वेदांग रैनाच्या तुरुंगात जाण्यामागे त्यांचा काही हात आहे का? असे अनेक प्रश्न ट्रेलर पाहून निर्माण होतात.

हेही वाचा…‘या’ दिग्गज अभिनेत्याने मांसाहारासाठी भाड्याने घेतलेलं घर, सचिन पिळगांवकर यांचा खुलासा; म्हणाले, “त्यांचे कुटुंबीय…”

बहीण-भावाचं नातं

जिगरा सिनेमाच्या पोस्टरमध्ये “तू मेरे प्रोटेक्शन में है,” असं म्हणत आलियाच्या हातात हातोडा घेतलेला प्रसंग दाखवला होता. सिनेमाच्या टीझरमध्ये “एक हजारों में मेरी बहना है” हे गाणं होत आणि त्यात बहीण भावाच नात दाखवण्यात आल होत. जिगराच्या ट्रेलरमध्येही बहीण-भावाचं प्रेमळ नातं आल आहे. लहानपणापासून आलिया भावाचं करीत असलेलं रक्षण हे क्षण ट्रेलरमध्येही दिसतात. हा सिनेमा ११ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alia bhatt action packed avatar in jigra trailer release psg