Chhaava Movie : लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ सिनेमाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुद्धा तुफान कमाई करत असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई-पुण्यात प्रेक्षक मोठ्या संख्येने ‘छावा’ पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. अनेक ठिकाणी विशेष शोचं आयोजन देखील करण्यात आलं आहे. याशिवाय ‘छावा’ पाहिल्यावर काही मराठी कलाकारांनी पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्याचं गेल्या काही दिवसात पाहायला मिळालंय.

प्राजक्ता माळी, क्रांती रेडकर, अभिजीत चव्हाण, अंशुमन विचारे, शरद पोंक्षे, सिद्धार्थ चांदेकर, नेहा शितोळे या सगळ्या कलाकारांनी महाराजांचा इतिहास मोठ्या पडद्यावर सादर केल्यामुळे सर्वप्रथम दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचे आभार मानले आहेत. आता मराठीसह बॉलीवूडमधून सुद्धा विकी कौशलवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. आयुष्मान खुराना, राजकुमार राव या कलाकारांपाठोपाठ ‘छावा’साठी आता आलिया भट्ट आणि करण जोहर यांनी देखील कौतुकास्पद पोस्ट शेअर केल्या आहेत.

“छावा…! या ब्लॉकबस्टर सिनेमासाठी संपूर्ण टीमचं खूप खूप अभिनंदन… चित्रपटाला असंच यश मिळत राहूदे! तो शेवटचा क्षण सर्वांनाच भावनिक करून जातो. विकी कौशल तुझ्या अभिनयाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. प्रत्येक फ्रेममध्ये तू जीव ओतून काम केलं आहेस. या सगळ्यात अक्षय खन्ना सुद्धा सर्वांचं लक्ष वेधून घेतो. दिनू ( दिनेश विजन ), लक्ष्मण आणि ‘मॅडडॉक फिल्म्स’ सर्वांचं खूप खूप अभिनंदन!” अशी पोस्ट शेअर करत करण जोहरने संपूर्ण टीमचं कौतुक केलं आहे.

karan johar
करण जोहरने ‘छावा’च्या टीमचं केलं कौतुक ( Chhaava Movie )

तर, दुसरीकडे ‘छावा’ पाहून स्टार अभिनेत्री आलिया भट्ट देखील थक्क झाली आहे. ती लिहिते, “विकी कौशल! अरे तू काय आहेस??? तुझी ‘छावा’मधली भूमिका कधीच कोणी विसरू शकणार नाही अशी आहे.”

alia bhatt
विकी कौशलसाठी आलिया भट्टची पोस्ट ( Chhaava Movie )

दरम्यान, विकी कौशलच्या सिनेमाने अवघ्या पाच दिवसात १७१.२८ कोटींची कमाई केली आहे. यामध्ये विकीसह रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, प्रदीप रावत, डायना पेंटी, विनीत सिंह, संतोष जुवेकर यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

Story img Loader