सामान्य व्यक्तीपासून सेलिब्रिटीजपर्यंत प्रत्येकजण सध्या दिवाळी साजरी करण्यात मग्न आहे. कोणी फटाके उडवत, कोणी नातेवाईकांच्या घरी जात, तर कोणी आपल्या घरच्यांबरोबर फराळाचा आनंद घेताना दिसतोय. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी दिवाळीनिमित्त पार्ट्याही आयोजित केल्या होत्या. त्या पार्ट्यांना बॉलिवूडमधील बऱ्याच कलाकारांनी हजेरी लावली. पण या सगळ्यात आलिया भट्ट कुठेच दिसली नाही. तसंच यावर्षीच्या दिवाळीचा तिने एकही फोटो पोस्ट केला नाही.

याबद्दल पोस्ट करताना आलियाने २ फोटो शेअर केले, एक गेल्यावर्षीच्या दिवाळीतील आणि एक यंदाच्या दिवाळीतील. यंदा आलिया गरोदर असल्याने तिने ग्लॅमरस फोटोशूट करण्याऐवजी घरच्या कपड्यांमध्ये बेडरूममध्ये आराम करताना तिने फोटो शेअर केला. त्यामुळेच आलिया कुठल्याच बॉलिवूड पार्टीत आपल्याला दिसली नाही. पण आपली सासू म्हणजेच नितू कपूर यांच्या घरी रणबीर आणि आलियाने दिवाळीनिमित्त एका पूजेसाठी हजेरी लावल्याचे फोटो सध्या सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

आणखी वाचा : सुशांत सिंग राजपूतची ही भूमिका साकारण्यास विजय वर्मा होता उत्सुक; म्हणाला “वाईट वाटतं…”

नितू कपूर यांच्या घरातील लक्ष्मीपूजनाचे काही फोटोज त्यांनी त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. या पूजेला रणबीरसह आलियादेखील हजर होती, फोटोत आपल्याला नितू कपूर पूजा करताना दिसत आहेत. आलियाबरोबरच तिची आई सोनी राजदान देखील या पूजेत सहभागी झाल्या होत्या. यानंतर नितू कपूर यांनी आलिया रणबीर आणि इतर लोकांबरोबर सेल्फी काढून तोदेखील शेअर केला आणि चाहत्यांना दिवाळीच्या खूप शुभेच्छादेखील दिल्या.

आलिया आता लवकरच आई होणार आहे. तसेच बाळाच्या जन्मानंतर आलिया कामातून एका वर्षाची सुट्टी घेणार आहे. त्यानंतर ती फरहान अख्तर दिग्दर्शित ‘जी ले जरा’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करेल. या चित्रपटात तिच्याबरोबर प्रियंका चोप्रा आणि कतरिना कैफही दिसणार आहेत.

Story img Loader