अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर आज गोंडस मुलीचे आई-बाबा झाले. बॉलिवूडच्या या बहुचर्चित जोडीने आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत केल्यानंतर सर्व सेलिब्रेटी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देताना दिसत आहेत. आलिया भट्टच्या सोशल मीडिया पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. यात दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूचाही समावेश आहे. नुकत्याच आई झालेल्या आलियाचं अभिनंदन करताना महेश बाबूने खास पोस्ट लिहिली आहे.

काही महिन्यांपूर्वी “मी बॉलिवूडला परवडणार नाही” असं वक्तव्य केल्याने चर्चेत आलेल्या महेश बाबूचे बॉलिवूडच्या अनेक कलाकारांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. आलिया भट्ट आई झाल्यानंतर तिने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली होती. आपल्या पोस्टमध्ये तिने लिहिलं, “…आणि आमच्या आयुष्यातील सर्वोत्तम बातमी. आमच्या बाळाचा जन्म झाला आणि ती एक मुलगी आहे. ती आमचं प्रेम आहे. आम्हाला तुम्हाला कळवण्यात आनंद होत आहे की आम्ही पालक झालो आहोत. खूप खूप प्रेम -आलिया-रणबीर”

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
siddharth shukla shehnaz gill
शहनाज गिलने दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लासाठी शेअर केली पोस्ट, ते दोन आकडे अन् चाहते म्हणाले…
Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
Shalva Kinjawadekar and Shreya Daflapurkar Pre Wedding Rituals
आली लग्नघटिका समीप! पार पडला ग्रहमख सोहळा, ‘शिवा’ फेम अभिनेत्याच्या होणार्‍या पत्नीने शेअर केले खास फोटो
katrina kaif vicky kaushal third marriage anniversary
लग्नाला तीन वर्षे पूर्ण! कतरिना कैफने पती विकी कौशलसाठी केली खास पोस्ट; म्हणाली, “दिल तू…”
Tuljabhavani Devi, Shakambhari Navratri festival,
धाराशिव : तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवास ७ जानेवारीपासून प्रारंभ

आणखी वाचा-मुलीच्या जन्मानंतर अलियाच्या पोस्टवर दीपिका- कतरिनाच्या प्रतिक्रिया, कमेंटने वेधलं लक्ष

आलियाच्या या पोस्टवर प्रियांका चोप्रा, कपिल शर्मा, करिना कपूर, दीपिका पदुकोणसह इतर अनेक सेलिब्रेटींनी कमेंट्स करत आलिया आणि रणबीरचं अभिनंदन केलं होतं. त्यानंतर आता दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबूने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर आलियाची ही पोस्ट शेअर केली आहे आणि या पोस्टबरोबरच त्याने एक खास कॅप्शनही दिलं आहे. “मुली खरंच खूप खास असतात!! अभिनंदन आलिया भट्ट आणि रणबीर कपूर” असं त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

आणखी वाचा- “७ महिन्यांतच मुलगी…” आलिया भट्ट आई झाल्यानंतर अभिनेत्यानं केलेलं ट्वीट चर्चेत

mahesh babu instagram

दरम्यान महेश बाबूची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. महेश बाबूच्या चाहत्यांना त्याचं आणि त्याच्या मुलीचं किती खास बॉन्डिंग आहे हे माहितच आहे. तो अनेकदा लेक सिताराबरोबरचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसतो. एकीकडे महेश बाबूने आलियाचं अशाप्रकारे अभिनंदन केलंय तर दुसरीकडे आलिया आणि रणबीरला मुलगी झाल्यानंतर अभिनेता अक्षय कुमारनेही “मुलीच्या जन्मापेक्षा जगात कोणताच दुसरा मोठा आनंद नाही” असं म्हटलं आहे. त्याची ही कमेंट खूप चर्चेत आहे.

Story img Loader