आलिया भट्ट व रणबीर कपूर या दोघांकडे बॉलीवूडमधील आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. दोघांमध्ये ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घट्ट मैत्री झाली अन् पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊन आलिया – रणबीरने २०२२ मध्ये लग्नगाठ बांधली. नोव्हेंबरमध्ये अभिनेत्रीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यांच्या दीड वर्षांच्या लेकीचं नाव राहा असं आहे. आलिया-रणबीरने नुकतीच जोडीने अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्याला उपस्थिती लावली होती. यावेळी दोघांनीही पार्टीत धमाल केल्याचं फॅन पेजवरून शेअर केलेल्या व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा भव्य संगीत सोहळा शुक्रवारी ( ५ जुलै ) रात्री पार पडला. या सोहळ्याला आलिया – रणबीरसह रितेश – जिनिलीया, माधुरी दीक्षित-श्रीराम नेने, जान्हवी कपूर, ओरी, करण जोहर, सलमान खान, रणवीर सिंह असे बॉलीवूडचे अनेक कलाकार उपस्थित राहिले होते. सध्या या सोहळ्यातील असंख्य Inside व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी मुकेश अंबानींचा मोठा मुलगा आकाशबरोबर मिळून “शो मी द ठुमका…” या गाण्यावर जबरदस्त डान्स करत ठुमके लगावल्याचं पाहायला मिळालं. हे गाणं श्रद्धा कपूर व रणबीर यांच्या ‘तू झुठी मैं मक्कार’ या चित्रपटातलं आहे. हा चित्रपट २०२३ च्या सुरुवातीला प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटातील हे ‘ठुमका साँग’ सर्वत्र प्रचंड गाजलं. याच गाण्यावर रणबीर व आलियाने भन्नाट डान्स केला आहे.
कपूर कुटुंबाच्या सुनेने या संगीत सोहळ्यासाठी खास मॉर्डन काळ्या रंगाचा व त्यावर सोनेरी वर्क असलेला सुंदर असा भरजरी लेहेंगा घातला होता. तर, रणबीरने आपल्या बायकोला मॅचिंग होईल अशी शेरवानी घातली होती. मोकळे केस, लांब कानातले आलियाचा हा वेस्टर्न लूक लक्षवेधी ठरला. दोघंही या ब्लॅक आऊटफिटमध्ये फारच सुंदर दिसत होते. भर पार्टीत दोघांचा डान्स करताना व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.
हेही वाचा : Video : ‘ओम शांती ओम’, शाहरुख खानच्या गाण्यावर अंबानी कुटुंबाचा जबरदस्त डान्स! जावई आनंद पिरामलही थिरकले
दरम्यान, अनंत-राधिकाचा लग्नसोहळा १२ जुलैला बीकेसी येथे पार पडणार आहे. या सोहळ्याला अनेक हॉलीवूड सेलिब्रिटी देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सध्या दोघांच्या लग्ना आधीच्या विधींना सुरुवात झाली असून हे सगळे विधी १४ जुलैपर्यंत असणार आहे.