Koffee With Karan Season 8 : ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमाचा आठवा सीझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या नव्या सीझनमध्ये आतापर्यंत रणवीर सिंह-दीपिका पदुकोण, सनी व बॉबी देओल, अनन्या पांडे आणि सारा अली खान यांनी हजेरी लावली होती. आता लवकरच या शोमध्ये करीना कपूर खान आणि आलिया भट्ट ही नणंद-भावजयची जोडी सहभागी होणार आहे. याचा प्रोमो सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. यावेळी करण जोहरशी संवाद साधताना करीनाने आलियाला एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

हेही वाचा : “गार्गी माझा आरसा आहे”, नागराज मंजुळेंचे पत्नीबद्दल विधान; पहिली भेट कुठे झाली होती? म्हणाले, “आम्ही…”

When Devendra Fadnavis becomes Chief Minister conspiracy is hatched to create communal tension says Amar Sable
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र…”- अमर साबळे
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
sonakshi sinha reaction on pregnancy rumours
सोनाक्षी सिन्हाने गरोदर असल्याच्या अफवांवर दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “लोक वेडे…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Priya Berde
प्रिया बेर्डे यांना भविष्यात साकारायचीय ‘ही’ व्यक्तिरेखा, म्हणाल्या, “माझ्या आईने…”
Nana Patole
Nana Patole : “उत्तमराव जानकरांसह आम्ही खूप लोक राजीनामा द्यायला तयार, पण…”; नाना पटोलेंचं मारकडवाडीत मोठं विधान
Alia Bhatt
आलियाची लेक राहा कपूर आजीला कोणत्या नावाने मारते हाक? सोनी राजदान म्हणाल्या…
Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde ,
खातेवाटपाच्या पेचामुळे दोन उपमुख्यमंत्री बिनखात्याचे

‘कॉफी विथ करण’च्या आठव्या सीझनच्या चौथ्या एपिसोडमध्ये बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि करीना कपूर खान सहभागी होणार आहेत. करण जोहरच्या प्रश्नांना जबरदस्त उत्तर देत दोघींनीही मिळून दिग्दर्शकाची बोलती बंद केल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. आता पिंकविलाने दिलेल्या रिपोर्टनुसार, करीनाने आलियाला दुसऱ्या बाळाविषयी सल्ला दिल्याचं समोर आलं आहे.

आलिया भट्ट तिची लेक राहाबद्दल सांगताना म्हणाली, “मी आणि रणवीर आम्ही दोघंही राहाबरोबर खूप वेळ घालवत असतो. अनेकदा रणवीर आणि माझी राहाचे जास्त लाड कोण करणार यावरून भांडणं होतात. तू राहाला जास्त वेळ घेतलंय…आता माझ्याकडे दे असं सगळं आमच्या घरी सुरू असतं.” आलिया भट्टने केलेला खुलासा ऐकून करीना म्हणाली, “यावर एकच उपाय आहे तुम्ही दुसऱ्या बाळाची तयारी करा जेणेकरून तुम्हा दोघांकडे एक-एक बाळ असेल.”

हेही वाचा : फोटोतील चिमुकलीला ओळखलंत का? ‘या’ मालिकेमुळे रातोरात झाली प्रसिद्ध, आता आहे छोट्या पडद्यावरची नंबर १ सूनबाई!

दरम्यान, आलिया भट्ट आणि करीना कपूर खान यांचा एपिसोड १६ नोव्हेंबरला डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी ॲपवर प्रक्षेपित होणार आहे. दोघीही करण जोहरच्या अत्यंत जवळच्या मैत्रिणी असल्याने या भागाबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. याशिवाय लवकरच या पर्वात रानी मुखर्जी, काजोल, दिग्दर्शक रोहित शेट्टी, अजय देवगण यांसारखे दिग्गज कलाकार हजेरी लावणार आहेत.

Story img Loader