बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते. नुकतंच आलिया भट्टबरोबर एक खळबळजनक प्रकार घडला आहे. तिच्या लिव्हिंग रुममधील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामुळे तिने पापाराझी कल्चरवर संताप व्यक्त केला आहे.

आलिया भट्टने नुकतंच इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला आहे. त्याबरोबरच आलियाने संताप व्यक्त करत याबद्दल पापाराझींना जाबही विचारला आहे.
आणखी वाचा : Video : गाडीतून उतरली, रेखा यांच्या तोंडाजवळ गेली अन्… आलिया भट्टचा ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले

A mechanism has been created by the ST administration to complain to the depot head about any problem in the journey of the ST Mumbai news
एसटी प्रवासात अडचण आल्यास थेट आगार प्रमुखांना फोन करा
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Pimpri, Notice to Engineers, Road Repair Works pimpri,
पिंपरी : रस्ते दुरुस्तीच्या कामांवर देखरेख ठेवणाऱ्या अभियंत्यांना नोटीस; काय आहे कारण?
Live in relationship
“लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या सज्ञान जोडप्यांना संरक्षण दिलं पाहिजे, मग ते विवाहित असले तरीही”, उच्च न्यायालयाचे निरीक्षण
Two girls sexually assaulted by father in Versova Mumbai news
दोन मुलींवर पित्याकडून लैंगिक अत्याचार; वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Rape in Uttarpradesh
Rape in UP : रात्री शौचास गेली अन् शाळेतील शिपायांनी रोखलं; १३ वर्षीय मुलगी गर्भवती राहिल्याने धक्कादायक प्रकार उजेडात!
health experts advise drummers for relief from permanent pain due to drumming
Pain From Drumming : ढोल-ताशावादनामुळे जडतेय कायमचे दुखणे! आरोग्यतज्ज्ञांचा वादकांना काळजी घेण्याचा सल्ला
Bajaj Finance officials beaten up by borrowers in Kanchengaon in Dombivli
डोंबिवलीतील कांचनगावमध्ये बजाज फायनान्सच्या अधिकाऱ्यांना कर्जदारांकडून मारहाण

नेमकं काय घडलं?

आलिया भट्ट ही तिच्या लिव्हिंग रुममध्ये बसली होती. त्यावेळी तिला समोरच्या इमारतीवरील गच्चीवरुन दोन जण कॅमेरे घेऊन डोकावत असल्याचं तिला दिसलं. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर तिने हे फोटो पोस्ट करत संबंधित प्रसारमाध्यमासह पापाराझींना जाब विचारला आहे.

आलिया भट्टची पोस्ट

“तुम्ही मस्करी करताय का? मी माझ्या लिव्हिंग रुममध्ये दुपारी निवांत बसले होते आणि तेव्हा मला जाणवलं की कोणीतरी मला पाहतंय. मी उठून पाहिलं तर समोरच्या इमारतीच्या गच्चीवरुन दोन व्यक्ती कॅमेरा लावून माझ्याकडे पाहत होते. हा प्रकार कोणत्या जगात मान्य आहे आणि हे असं करणं कितपत योग्य आहे?

एखाद्याच्या खासगी आयुष्यात डोकावणे ही सर्वात वाईट गोष्ट आहे. प्रत्येकाला एक मर्यादा असते, जी तुम्ही ओलांडू शकत नाही. पण आज मला हे म्हणावं लागतंय की तुम्ही सर्व मर्यादा ओलांडल्या आहात”, अशी पोस्ट आलियाने केली आहे.

आणखी वाचा : Dadasaheb Phalke Award 2023 : आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, तर रणबीरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

आलियाने ही पोस्ट शेअर करत मुंबई पोलिसांनाही टॅग केले आहे. तिच्या या पोस्टनंतर अनेक कलाकार हे संताप व्यक्त करत आहे. आलियाच्या या पोस्टवर सर्वसामान्यांशिवाय बॉलिवूडमधील इतर सेलिब्रिटींनीही प्रतिक्रिया देत राग व्यक्त केला.