Alia Bhatt Birthday Celebration : अभिनेत्री आलिया भट्टचा आज ३१ वा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त चाहते व बॉलीवूड सेलिब्रिटी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. आलियाने कुटुंबियांबरोबर वाढदिवसाचं रात्री सेलिब्रेशन केलं. मुंबईतील प्रसिद्ध ताज हॉटेलमध्ये ती भट्ट व कपूर कुटुंबियांबरोबर दिसली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मध्यरात्री ताज हॉटेलमध्ये आलिया भट्टच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यात आलं. तिच्या वाढदिवसासाठी भट्ट व कपूर कुटुंबीय ताजमध्ये पोहोचले होते. आई सोनी राजदान, बहीण शाहीन भट्ट, सासूबाई नीतू कपूर, रणबीर कपूर यांच्यासह आलिया भट्टचा एक व्हिडीओ वरिंदर चावला या पापाराझी अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये आलियाच्या मैत्रिणीदेखील दिसत आहेत.

प्रियांका चोप्राची बहीण झाली केजरीवालांची सून! मीराने ४० व्या वर्षी बांधली लग्नगाठ, फोटो शेअर करत म्हणाली…

आलिया भट्टच्या वाढदिवसाला अंबानी कुटुंबातील काही सदस्यदेखील हजर होते. त्यांचा ताजमधून बाहेर पडतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. आकाश अंबानी, ईशा अंबानी व तिचे पती आनंद पिरामल हे तिघेही आलियाच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन झाल्यानंतर घरी जाताना पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

बहीण मीराच्या लग्नानंतर दोन दिवसांनी अचानक भारतात आली प्रियांका चोप्रा, मुलीबरोबरचा व्हिडीओ व्हायरल

आलिया भट्टचे चाहते तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. ३१ वर्षीय आलियाच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तिच्या आगामी ‘जिगरा’ चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं आहे. २०२३ मध्ये आलेला तिचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपट सुपरहिट ठरला होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alia bhatt birthday celebration at taj ranbir kapoor akash ambani isha ambani videos viral hrc