बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल आलिया भट्ट व रणबीर कपूर महिन्याभरापूर्वीच आईबाबा झाले. ६ नोव्हेंबरला आलियाने गोंडस मुलीला जन्म दिला. रणबीर-आलियाने त्यांच्या मुलीचे नाव ‘राहा’ असे ठेवले आहे. सध्या आलियाचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
लेक राहाला स्तनपान करतानाच्या आलियाच्या फोटोने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा फोटो सोशल मीडियावर वायू वेगाने व्हायरल होत आहे. फोटोमध्ये आलियाने लाल रंगाची साडी नेसलेली दिसत आहे. लेक राहाला स्तनपान करताना ती फोटोत दिसत आहे.
हेही वाचा>> ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच विकास सावंतने किरण मानेंबाबत केलं मोठं वक्तव्य, म्हणाला…
हेही वाचा>> अक्षय कुमार साकारणार लिओनेल मेस्सीची भूमिका? अभिनेत्याचे अर्जेंटिनाच्या जर्सीतील फोटो व्हायरल
गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या फोटोमागचं सत्य अखेर समोर आलं आहे. हा फोटो आलियाचा नसून एका स्तनपान करणाऱ्या महिलेचा आहे. या फोटोला एडिट करुन तो आलियाचा असल्याचं भासवण्यात आलं आहे.
![alia bhatt breastfeeding photo viral (2)](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2022/12/alia-bhatt-breastfeeding-photo-viral-2.jpeg?w=830)
हेही वाचा>> उर्फी जावेदला झाला आहे ‘हा’ गंभीर आजार; दुबईच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल
आलिया-रणबीरला कन्यारत्नाची प्राप्ती झाल्यानंतर कपूर कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मुलीच्या जन्मानंतर रणबीरने काहीच दिवसांत कामाला पुन्हा सुरुवात केल्याचं दिसून आलं. त्यानंतर आलियालाही योगा क्लासबाहेर स्पॉट करण्यात आलं होतं.