बॉलीवूडच्या कपूर कुटुंबात सध्या लग्नाची धामधूम सुरू आहे. करीना-करिश्मा, रणबीर कपूरचा भाऊ आदर जैन लवकरच हिंदू रिती-रिवाजानुसार लग्नबंधनात अडकणार आहे. याआधी आदरने गोव्यात ख्रिश्चन पद्धतीने अलेखा आडवाणीशी लग्न केलं होतं. त्यानंतर आता मुंबईत मोठ्या थाटामाटात हिंदू परंपरेनुसार आदर लग्नगाठ बांधणार आहे. लग्नाआधीच्या समारंभाला सुरुवात झाली आहे. नुकताच मेहंदीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला कपूर कुटुंबातील सदस्यांसह बॉलीवूडमधील बऱ्याच कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. आदर आणि अलेखाच्या मेहंदी सोहळ्यामध्ये आलिया भट्ट चांगलीच भाव खाऊन गेली.

आदर जैन आणि अलेखा आडवाणीच्या मेहंदी सोहळ्यात आलिया भट्ट पती रणबीर कपूरबरोबर पोहोचली होती. यावेळी आलियाने असा काही लूक केला होता, ज्यामुळे तिची सध्या खूप चर्चा रंगली आहे. दिराच्या मेहंदी सोहळ्याला आलियाने पिवळ्या रंगाचा भरजरी शरारा घातला होता. यावर तिने मोठे कानातले आणि न्यूड मेकअप केला होता. तसंच आलियाने हटके हेअरस्टाइल केली होती. तिने केसांची वेणी घातली होती, ज्यामध्ये निळ्या रंगाची रिबन होती. आलियाच्या याच हटके वेणीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतला आहे. दिराच्या मेहंदी सोहळ्यातील आलियाच्या लूकचा व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे.

आलिया भट्टची हटके हेअरस्टाइल पाहून अनेक नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एका नेटकरीने लिहिलं आहे, “अशी वेणी आमची आजी घालायची.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “साधा लूक हा नेहमीच मस्त असतो.” तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, आलियाला कोणीची टक्कर देऊ शकत नाही.

शशी कपूर यांच्याशी आदर जैनचं नातं काय?

आदर रीमा जैन यांचा मुलगा आहे. रीमा या शशी कपूरच्या यांच्या बहीण आहेत. त्यामुळे शशी कपूर आदरचे मामा लागतात. म्हणून करीना, करिश्मा, रणबीर कपूर हे आदरचे भाऊ आहेत.

दरम्यान, आलिया भट्टच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच ती ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात ती रणबीर कपूरबरोबर झळकणार आहे. याशिवाय आलिया ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात रणबीरबरोबर दिसली होती. तसंच आलिया ‘अल्फा’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर शर्वरी वाघ झळकणार आहे.

Story img Loader