नुकतंच एका नामांकित कॉस्मेटिक कंपनीचा ‘पॅरिस फॅशन वीक’ पार पडला. या ‘पॅरिस फॅशन वीक’साठी जगभरातील सौंदर्यवतींनी हजेरी लावली होती. यावेळी बॉलीवूडची अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन आणि आलिया भट्ट रॅम्प वॉक करताना दिसल्या. एकाबाजूला ऐश्वर्याने ऑफ शोल्डर रेड गाउनमध्ये जबरदस्त रॅम्प वॉक केला. तर दुसऱ्या बाजूला आलियाने सिल्वर आणि ब्लॅक कॉम्बिनेशनवाला सुंदर अशा ड्रेस मध्ये आपला जलवा दाखवला. सध्या ‘पॅरिस फॅशन वीक’मधील ऐश्वर्या व आलियाच्या रॅम्प वॉकचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल झाले आहेत.
अभिनेत्री आलिया भट्टने ‘पॅरिस फॅशन वीक’मधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. “एक्साइटमेंट, एम्ब्रेस आणि इन्स्पीरेशनची रात्र… कारण आम्ही #WorthIt आहोत,” असं कॅप्शन लिहित आलियाने फोटो शेअर केले आहेत. यामध्ये आलियाचे काही एकटीचे फोटो आहेत तर काही ग्रुपचे फोटो आहेत. या ग्रुप फोटोमध्ये जगभरातील सौंदर्यवती आहेत. ज्यामध्ये ऐश्वर्या राय-बच्चन देखील आहे. पण आलियाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ऐश्वर्या दिसत नाहीये. त्यामुळे आलियावर नेटकऱ्यांनी टीका केली आहे.
आलियाने दुसऱ्या फोटोमध्ये ऐश्वर्या राय-बच्चनला क्रॉप केल्याचं म्हटलं जात आहे. “तू ऐश्वर्याला दुर्लक्ष का केलंस?”, “यालाच म्हणतात मत्सर”, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया ऐश्वर्याच्या चाहत्यांनी आलियाच्या पोस्टवर दिल्या आहेत. पण ज्या फोटोमुळे ऐश्वर्याचे चाहते आलियावर टीका करत आहेत, तो फोटो झूम केलेला आहे. तिच्या पोस्टमध्ये आणखी एक लाँग शॉट फोटो देखील आहे, त्यात ऐश्वर्या राय-बच्चन दिसत आहे.
दरम्यान, कामाबद्दल बोलायचं झालं तर, आलिया भट्टचा ‘जिगरा’ नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात आलियाबरोबर अभिनेता वेदांग रैना झळकणार आहे. बहीण-भावाच्या नात्यावर आधारित असलेला ‘जिगरा’ चित्रपट ११ ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. तसंच ऐश्वर्या राय-बच्चन शेवटची ‘पोन्नियिन सेलवन: २’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिने दुहेरी भूमिका साकारली आहे. नंदिनी आणि मंदाकिनी देवी या दोन भूमिकेत ऐश्वर्या झळकली आहे. एका तामिळ कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहेत. या चित्रपटात ऐश्वर्या व्यतिरिक्त कार्ती, जयम रवी, त्रिशा, जयराम, प्रभू, आर सरथकुमार, शोभिता धुलिपाला, ऐश्वर्या लक्ष्मी, विक्रम प्रभू, प्रका राज, रहमान आणि आर पार्थिवन महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.