आलिया भट्ट ( Alia Bhatt ) आणि रणबीर कपूरच्या लाडक्या लेकीने म्हणजेच राहाने ( Raha Kapoor ) तिच्या क्यूटनेसने सगळ्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळेच राहाचा प्रत्येक व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होतं असतो. आलिया आपल्या लाडक्या लेकीबद्दल नेहमी कोणते ना कोणते खुलासे करत असते. अलीकडेच तिने राहाने तिचं पहिलं गाणं पाहिल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आलियाने राहा ‘नाटू-नाटू’ गाण्यावर कशी नाचते? हे सांगितलं. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या आलिया भट्ट ( Alia Bhatt ) तिचा आगामी चित्रपट ‘जिगरा’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. ११ ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलिया नुकतीच हैदराबादला गेली होती. या प्रमोशनच्यावेळी तिच्याबरोबर अभिनेत्री समांथा रुथ प्रभु, वेदांग रैना, राणा दग्गुबाती आणि प्रसिद्ध दिग्दर्शक त्रिविक्रिम श्रीनिवास होते. तेव्हा आलियाने राहाला ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू-नाटू’ गाणं खूप आवडत असल्याचं सांगितलं.

हेही वाचा – “तुझी लायकी किती, उंची किती…”, पंढरीनाथ कांबळेवर टीका करताना अभिजीत बिचुकलेंची जीभ घसरली; म्हणाले, “ज्याला गेली २५ वर्ष…”

आलिया भट्ट ( Alia Bhatt ) म्हणाली, “माझ्या घरी दररोज ‘नाटू-नाटू’ गाणं लावलं जात. माझी मुलगी राहाला ‘नाटू-नाटू’ गाणं खूप आवडतं. जेव्हा तिला डान्स करावास खूप वाटतो तेव्हा ती म्हणते, ‘मम्मा ‘नाटू-नाटू’ गाणं लाव.’ मग आम्ही गाणं लावतो तेव्हा ती म्हणते, ‘मम्मा, तू ये.’ त्यानंतर ती मला तिच्याबरोबर डान्स करायला सांगते आणि मग आम्ही एकत्र डान्स करतो. तिला ‘नाटू-नाटू’ गाण्यातील स्टेप्स येत नाहीत. पण थोडं-थोडं ती करते.”

पुढे आलिया भट्ट ( Alia Bhatt ) म्हणाली, “मी एका पुरस्कार सोहळ्यात ‘नाटू-नाटू’ गाण्यावर डान्स केला होता. त्याचा व्हिडीओ राहाने पाहिला. तेव्हापासून ती मला नेहमी सांगते, ‘मम्मा, तो ‘नाटू-नाटू’वाला व्हिडीओ दाखव.'”

हेही वाचा – Video: “पॅडी दादांनी मला एवढा जीव लावला…”, ट्रॉफी जिंकल्यावर अखेर सूरजने मान्य केली ‘ती’ गोष्ट, पंढरीनाथबद्दल म्हणाला…

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Bigg Boss 18 : हत्येआधी ज्योतिषाने सिद्धू मुसेवालाला केलं होतं सावध; तजिंदर बग्गा यांचा खुलासा, गुणरत्न सदावर्तेंना म्हणाले…

दरम्यान, आलिया भट्टचा ( Alia Bhatt ) आगामी चित्रपट ‘जिगरा’चं दिग्दर्शन वासना बाला यांनी केलं आहे. तर करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन आणि आलियाच्या इटर्नल सनशाईन प्रोडक्शनने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alia bhatt daughter raha kapoor like naatu naatu song and dance with mother watch video pps