Alia Bhatt shares seven course meal Photo: कपूर कुटुंब सतत चर्चेत राहणारे कुटुंब आहे. नीतू कपूर, रिद्धिमा कपूर, रणबीर कपूर, आलिया भट्ट हे सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. नीतू कपूर व रिद्धिमा मुलाखतींमधून त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. तर, रणबीर व आलिया त्यांच्या चित्रपटांमुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असतात.
राहाने आईसाठी बनवले जेवण
चित्रपटांबरोबरच आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. आलिया सोशल मीडियावर अनेक गोष्टी शेअर करते. तिच्या आयुष्यातील काही खास गोष्टी शेअर करते. या सगळ्यात कलाकार जोडप्याची लेक राहा सर्वांचे लक्ष वेधून घेते. आलिया तिचे फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर शेअर करत नसली, तरी तिच्याबाबतच्या अनेक गोष्टी ती शेअर करते. आता आलिया भट्टने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे.
आलिया भट्टने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत सुंदर सजवलेले एक डायनिंग टेबल दिसत आहे. त्यामध्ये खेळण्यातील कणकेपासून जेवण बनवल्याचे दिसत आहे. आलिया-रणबीरच्या दोन वर्षांच्या मुलीने तिच्या कल्पनेनुसार जेवण बनवल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करताना आलियाने लिहिले, “माझ्या आवडत्या शेफने प्रेमाने माझ्यासाठी ७ कोर्स असलेले जेवण बनवले आहे.”

आलिया भट्टची लेक सातत्याने चाहत्यांची मने जिंकते. सार्वजनिक ठिकाणी जेव्हा ती तिच्या आई-वडिलांबरोबर दिसते, तेव्हादेखील तिचा वावर लक्ष वेधून घेतो. तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळते. नोव्हेंबर २०२२ मध्ये राहाचा जन्म झाला. दरम्यान, नुकतीच आलिया भट्ट व रणबीर कपूर यांच्या लग्नाला नुकतीच तीन वर्षे पूर्ण झाली.
त्या निमित्ताने आलियाने रणबीर कपूरबरोबरचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्याला हॅप्पी ३ अशी कॅप्शन दिली आहे. अभिनेत्रीच्या या पोस्टवर कलाकारांनी त्यांनी शुभेच्छा दिल्याचे कमेंट्समध्ये पाहायला मिळाले. त्या पोस्टवर रणबीरची आई नीतू कपूरने हार्ट इमोजी पोस्ट केल्या. तर, आलियाची आई सोनी राजदान यांनी लिहिले, “लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.” करीना कपूर आणि रणवीर सिंग यांनीही कमेंट्स करीत त्यांना शुभेच्छा दिल्या. लोकप्रिय दिग्दर्शिका झोया अख्तरनेही ‘हॅपी ३’ अशी कमेंट केली.
कामाच्या बाबतीत बोलायचे, तर आलिया भट्ट आणि रणबीर कपूर संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटात एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटात विकी कौशलचीही भूमिका आहे.