बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लवकरच आई-बाबा होणार आहेत. त्यामुळे ते दोघेही सातत्याने चर्चेत आहे. गेल्या महिन्यात आलियाच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला. आलिया भट्टच्या बाळासाठी कपूर कुटुंबियाप्रमाणेच तिचे चाहतेही उत्सुक आहेत. नुकतंच तिच्या प्रसूतीची तारीख समोर आली आहे. येत्या नोव्हेंबर महिन्याअखेरपर्यंत ती बाळाला जन्म देऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र यानंतर ती लग्नाआधीच गरोदर होती का? अशी शंका उपस्थित केली जात आहे.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरने लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांतच आई-बाबा होणार असल्याची गोड बातमी चाहत्यांना दिली. त्यानंतर आलिया अनेकदा बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसून आली. लग्नानंतर लगेचच गरोदरपणाची घोषणा करणाऱ्याला आलियाला ट्रोलही करण्यता आले. मात्र यावर तिने स्पष्ट भाषेत उत्तर दिले होते. त्यानंतर आता तिच्या प्रसूतीची तारीखही समोर आली आहे. आलिया भट्ट ही नोव्हेंबर महिन्यात बाळाला जन्म देणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
आणखी वाचा : विश्लेषण : रणबीर कपूरने बाळासाठी घेतलेल्या पॅटर्निटी लीव्हचा नेमका अर्थ काय? जाणून घ्या कायदा आणि तरतुदी

premature birth misunderstanding about babies born at 8 months not to survive
स्त्री आरोग्य : आठव्या महिन्यातलं मूल वाचत नाही?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
sonakshi sinha reaction on pregnancy rumours
सोनाक्षी सिन्हाने गरोदर असल्याच्या अफवांवर दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “लोक वेडे…”
Maharashtrachi HasyaJatra Fame shivali parab revealed her crush Rohit mane
“मला दुसरं लग्न करावं लागतंय”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सावत्या असं का म्हणाला? जाणून घ्या…
article for husband and wife to maintaining healthy relationships
समुपदेशन : तुमचं ‘रॉटन रिलेशनशिप’ नाही ना?
The Nagpur Bench of Bombay High Court ruled on girls entitlement to maintenance
अविवाहित मुलीला वडिलांकडून पोटगी मिळू शकते? न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय….
amber heard to be mother second time
घटस्फोटाच्या खटल्यामुळे जगभर राहिली चर्चेत; प्रसिद्ध अभिनेत्री लग्न न करताच दुसऱ्यांदा होणार आई
keerthy suresh antony thattil wedding
नागा चैतन्य-सोभितानंतर आणखी एक अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात, बॉयफ्रेंडबरोबर पोहोचली गोव्यात; पत्रिका पाहिलीत का?

‘ईटाइम्स’ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आलिया २० ते ३० नोव्हेंबर या दिवसांमध्ये बाळाला जन्म देऊ शकते. विशेष म्हणजे आलियाची बहीण शाहीन भट्टचा वाढदिवसही नोव्हेंबर महिन्यातील २८ तारखेला असतो. त्यामुळे मावशीच्या वाढदिवशी आलियाचं बाळ जन्माला येऊ शकते. नोव्हेंबर महिन्यातील २८ तारखेला सोमवार आहे. गिरगावातील ‘एच.एन.रिलायन्स’ रुग्णालयात आलिया तिच्या बाळाला जन्म देणार आहे. या रुग्णालयात तिचं नाव नोंदविण्यात आलं आहे.

जर आलियाने २८ नोव्हेंबरला बाळाला जन्म दिला तर भट्ट कुटुंबात दोन वाढदिवस एकाच दिवशी साजरे होती, असा अंदाज वर्तवला जात आहे. तसेच आलियाच्या प्रसूतीची तारीख जर बरोबर असेल तर ती लग्नाआधी गरोदर होती का? या चर्चांना पुन्हा एकदा उधाण येणार आहे.

आणखी वाचा : “जेव्हा वयाच्या तिशीत तुम्हाला मुलं नसतात…” प्रार्थना बेहरेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

कारण आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचे लग्न १४ एप्रिल २०२२ रोजी मुंबईत झाले होते. लग्नानंतर दोन महिन्यांनी म्हणजे जून महिन्याच्या अखेरीस त्यांनी ही गुडन्यूज चाहत्यांना दिली. त्यानंतर आता येत्या नोव्हेंबर अखेरीस ती तिच्या बाळाला जन्म देणार आहे. आलिया आणि रणबीरच्या लग्नाला फक्त ७ महिने पूर्ण होत आहेत. त्यामुळे आलिया ही लग्नाआधीच गरोदर होती, असा अंदाज नेटकरी लावताना दिसत आहे.

लग्नाआधीच आलिया गरोदर असल्याने त्यांनी घाईघाईत लग्नाचा निर्णय घेतल्याचे बोललं जात आहे. विशेष म्हणजे त्यानंतर अवघ्या दोन महिन्यांनी त्यांनी गरोदर असल्याची घोषणाही केली होती. त्यांनी सोशल मीडियाद्वारे याबद्दलची घोषणा केली होती. त्यांनी एक फोटो शेअर करत याबद्दल जाहीर केले होते. दरम्यान आलिया आणि रणबीर दोघेही त्यांच्या बाळासाठी उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे. रणबीरने बाळासाठी पॅटनिर्टी लीव्ह घेतली आहे. तर आलिया ही पुढे एक वर्ष कोणतेही काम करणार नसल्याचे समोर आले आहे.

Story img Loader